27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

आता घरातच करा शेती, एकाच झाडापासून मिळवा बटाटा, टोमॅटो, वांगी, दुधी आणि मिर्ची, कसं? वाचा


मुंबई 23 सप्टेंबर : लोकांमध्ये किचन गार्डनिंगचा छंद वाढत आहे. लोक आपल्या स्वत:च्या बागेत किंवा टेरेस गार्डनमध्ये लहान मोठ्या भाज्या उगवत आहेत. जेणेकरुन त्यांना आपल्या घरातील आणि कोणत्याही रसायना शिवाय भाजी मिळेल, ज्याचा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होईल. अशा परिस्थितीत वाराणसी येथील इंडियन व्हेजिटेबल रिसर्च इन्स्टिट्यूट (IIVR) च्या शास्त्रज्ञांनी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे.

शास्त्रज्ञांनी त्यांच्या तंत्रज्ञानाने अशी झाडे विकसित केली आहेत, ज्यामध्ये बटाटा, टोमॅटो, वांगी आणि मिरचीचे उत्पादनही करता येते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.

तुम्ही आधी हा फोटो नीट पाहा, ज्यामध्ये तुम्हाला एकाच झाडाला वेगवेगळ्या भाज्या लागल्या असल्याचं दिसेल, हा फोटो एडिट केलेला नाही तर तो खरा आहे.

या झाडांना ब्रिमटो आणि पोमॅटो अशी नावे देण्यात आली आहेत. 5 वर्षांच्या संशोधनानंतर एकाच रोपात कलम करून दोन भाज्या उगवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

हे वाचा : पांढरा की लाल; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल

नवभारत टाइम्सशी बोलताना शास्त्रज्ञ डॉ. अनंत कुमार म्हणाले, कलमी तंत्राने तयार केलेली झाडे किचन गार्डन किंवा पॉटसाठी योग्य आहेत. त्यामुळे तुम्ही ती तुमच्या घरी उगवू शकता.

पोमॅटोच्या झाडापासून 2 किलो टोमॅटो आणि 600 ग्रॅम बटाटा तयार करता येतो. बटाटे जमिनीच्या खालच्या भागात वाढतील आणि टोमॅटो वरच्या बाजूला.

दुसरीकडे, ब्रिमटोच्या एका रोपातून सुमारे 2 किलो टोमॅटो आणि अडीच किलोपर्यंत वांगी घेता येतात. त्याच वेळी, त्याच वनस्पतीमध्ये टोमॅटोसह मिरची, दुधी, काकडी आणि कारले देखील उगत आहे.

बटाट्याचे रोप जमिनीपासून किमान ६ इंच उंच झाल्यावर त्याला टोमॅटचं झाड जोडलं जातं. पण यासाठी दोन्ही झाडांच्या देठाची जाडी समान असावी. त्यानंतर 20 दिवसांनी दोन्ही एकत्र झाल्यानंतर ते शेतात सोडावे. हे झाड लावल्यानंतर दोन महिन्यांनी टॉमेटो आणि बटाटे काढू शकता.

तसेच वांग्याचं झाड लावल्यानंतर 5 दिवसांनी आणि टोमॅटोचं झाड 22 दिवसांनी कलम करावे. अशा प्रकारे, एका झाडाला दोन रोपं येऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News