22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

आर्थिक लाभ होईल पण खर्चही आहे; राशीनुसार तुमचं आजचं भविष्य – News18 लोकमत


आज दिनांक 23 सप्टेंबर 2022, शुक्रवार. आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत होणार आहे. आज त्रयोदशी श्राद्ध आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र पंचम स्थानात असून संततीबाबत मानसिक ताण निर्माण होईल. धन स्थानातील मंगळ आर्थिक काळजी घ्या असं सुचवत आहे. स्वभाव रागीट होईल. प्रवास योग येईल. उत्तम दिवस.

वृषभ

राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र आज शुभ वार्ता देईल. थोडी दगदग होईल. गृहसौख्य मिळेल. मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, सामाजिक जीवनात जोडीदाराच्या सोबत आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे.

मिथुन

कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध सुधारण्याचे योग आहेत. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ.

कर्क

द्वितीय चंद्र असून कौटुंबिक गोष्टीत मन रमेल. संततीसंबंधी शुभ काळ. काहीसा तणाव वाटेल. प्रवास होतील. आर्थिक लाभ होतील. एकूण दिवस समाधानात जाईल.

सिंह

आज चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल. फार ताण घेऊ नका. घरामध्ये जास्तीचे काम पडेल. मित्रमैत्रिणी भेटतील. धार्मिक कार्य घडेल. दिवस समाधानात जाईल.

कन्या

व्यय स्थानातील चंद्र कार्यालयीन आणि घरगुती कामात वाढ करेल. खरेदीसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. खर्च होईल. धार्मिक कार्यक्रम होईल. आनंद आणि उत्साहात दिवस पर पडेल.

तूळ

आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षण आणि कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. संततीसाठी भाग्यदायक योग. दिवस चांगला.

वृश्चिक

कुटुंबातील व्यक्तीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. दुपारनंतर सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.

धनु

आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. भाग्य स्थानातील चंद्र धार्मिक बाबीत खर्च देईल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ.

मकर

प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्त्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक खर्च होतील. जोडीदारासोबत मजेत एकत्र दिवस घालवा. शनी वक्री मनस्ताप देईल. दिवस चांगला.

कुंभ

आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनी सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. संततीला वेळ द्या. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ.

मीन

षष्ठ स्थानातील चंद्र मनःस्वास्थ्य कमी देईल. शुभ घटना घडतील. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. उत्तम असा दिवस आहे.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News