27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

किचनमध्ये सहज उपलब्ध असलेले हे पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात – News18 लोकमत


मुंबई, 23 सप्टेंबर : मधुमेह ही आपल्यासाठी मोठी समस्या बनत चालली आहे. रक्तातील साखरेच्या वाढीमुळे मधुमेहाचा त्रास होतो. यामुळे हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, किडनी आणि नसांशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या माहितीनुसार, जगभरात 422 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. वास्तविक, जेव्हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू लागते, तेव्हा मधुमेहाचा आजार होतो. आपण अन्न खातो तेव्हा ते पोटात जाते. या दरम्यान शरीराला आवश्यक पोषक तत्व अन्नातून मिळतात. कार्बोहायड्रेट देखील अन्नातून मिळतात. कार्बोहायड्रेट्सचे रक्तातील ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. शरीराला ऊर्जेसाठी आवश्यक असलेल्या ग्लुकोजचे कॅलरीजमध्ये रूपांतर होते. उर्वरित ग्लुकोज इंसुलिन हार्मोनद्वारे शोषले जाते. परंतु, कमी इन्सुलिनमुळे ग्लुकोजचे शोषण शक्य होत नाही. त्यामुळे अतिरिक्त ग्लुकोज रक्तात जमा होऊ लागते आणि मधुमेहाच्या रूपात बाहेर पडते. रक्तातील ग्लुकोजची वाढलेली पातळी आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांनी कमी केली जाऊ शकते.

बडीशेप-

बडीशेप (सौफ) फक्त माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जात नाही, तर आयुर्वेदात त्याच्या अनेक औषधी गुणधर्मांची माहिती दिली आहे. बडीशेपमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. याशिवाय कॅल्शियम, जस्त, मँगनीज, लोह, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम आणि सेलेनियम देखील त्यात असतात. Food.NDTV च्या माहितीनुसार, बडीशेपमध्ये मधुमेहाशी लढण्याची क्षमता असते. बडीशेप रक्तातील साखर कमी ठेवते आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढवते.

मेथीचे दाणे-

मेथीचे दाणे कुणाच्याही स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतील. यामध्ये डाइट्री फाइबर असते जे इन्सुलिन वाढवण्यास मदत करते. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, 10 ग्रॅम मेथीचे दाणे पाण्यात भिजवून त्याचे सेवन केल्याने टाइप 2 मधुमेह नियंत्रित राहु शकतो. संशोधनानुसार, मेथीचे दाणे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करतात.

हळद-

हळदीच्या फायद्यांविषयीही आपल्या सर्वांना माहिती आहे. हळद जशी चेहऱ्यावर चमक आणते, त्याचप्रमाणे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढवते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग असते, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेट्री गुणधर्म असतात. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.

हेे वाचा –मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही

कढीपत्ता –

दक्षिण भारतात जवळपास सर्व प्रकारच्या भाज्यांमध्ये कढीपत्ता वापरला जातो. कढीपत्त्यात अनेक प्रकारचे संयुगे देखील आढळतात, जे रक्तातील साखर संतुलित ठेवतात. त्याच्या नियमित सेवनाने इंसुलिन संवेदनशीलता सुधारते. कढीपत्त्याचा काढा करून पिणे अधिक फायदेशीर ठरते.

हे वाचा – तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

गिलॉय –

बाबा रामदेव यांनी गिलॉय बहुतांश घरांपर्यंत पोहचवली आहे. गिलॉयच्या सेवनाने रक्तातील साखरेचे नियंत्रणही राहते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होऊ देत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News