23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

कोरोनासारखे व्हायरल इन्फेक्शन रोखण्यासाठी ‘जल नेति’ योग क्रिया प्रभावी, इतरही फायदे


नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : भारतामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेद आणि योगासनांना खूप महत्त्व आहे. शेकडो वर्षांपूर्वी याद्वारे मोठ्या आजारांवर उपचार केले जात होते. आजच्या बदलत्या जीवनशैलीतही योगाचे महत्त्व खूप आहे. योगा केल्याने आपली तंदुरुस्ती टिकून राहते, तसेच आपली प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते आणि आपल्याला अनेक सामान्य आणि गंभीर आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये योगाबद्दल एक नवी जाणीव निर्माण झाली आहे. कोरोनाच्या वारंवार होणाऱ्या चढ-उतारांमुळे आपण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लोक संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाय करतानाही दिसले. असाच एक उपाय म्हणजे जल नेति योग जो आपल्याला कोरोनासारख्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यास मदत करू शकतो. जल नेती ही एक योगसाधना आहे, ज्याला आयुर्वेदात स्थान मिळाले आहे, या क्रियेद्वारे नाक स्वच्छ केले जाते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.

कोरोना संसर्ग प्रतिबंध –

कोरोना महामारीच्या काळात, अनेक आयुर्वेद तज्ज्ञांनी दावा केला की जल नेती योग क्रियेद्वारे श्वसनमार्गाची स्वच्छता कोविड संसर्ग टाळण्यास मदत होते. असा दावाही करण्यात आला की, जर एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल आणि तो दररोज जल नेती योग क्रिया करत असेल तर रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत होते.

अ‌ॅलर्जीमध्ये आराम –

जल नेति योग क्रिया आपल्या अनुनासिक मार्ग आणि सायनसमधून विषारी कण काढून टाकते, ज्यामुळे शरीरात हवा सहजतेने वाहते आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते. ज्यांना सर्दी, खोकला, सायनुसायटिस आणि श्वसनाच्या ऍलर्जीचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही जल नेती प्रभावी आहे.

या आजारांवरही गुणकारी –

जल नेतीबाबत आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या योगाभ्यासामुळे केवळ कोरोनाचा संसर्ग रोखण्यातच नाही तर इतर अनेक आजारांना प्रतिबंध करण्यात आणि रुग्णांना बरे करण्यातही मदत होते. असे केल्याने अस्थमा, न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसाचा क्षय यांसारखे दीर्घकाळ टिकणारे आजारही कमी वेळात बरे होऊ शकतात. जल नेती कान, नाक आणि घशाचे रोग जसे मायोपिया, ऍलर्जीक राहिनाइटिस आणि टॉन्सिलिटिस बरे करण्यास देखील मदत करते.

ग्लोईंग स्कीनसाठी सर्वोत्तम योग –

तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल, तर यामध्येही जल नेती खूप उपयुक्त आहे. जल नेती चेहऱ्याच्या स्नायूंना आराम देते आणि तुमचा चेहरा चमकदार बनवते. राग आणि तणाव कमी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

हे वाचा – तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

रक्त प्रवाह सुधारते –

जल नेतीचा सतत सराव केल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि शरीरातील रक्तप्रवाहही वाढतो. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच शरीरातील पेशी सक्रिय ठेवतात.

हेे वाचा –मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही

घरी जल नेती कशी करतात –

1. एक भांडे किंवा ग्लास मिठाच्या पाण्याने भरून घ्या, पायामध्ये व्यवस्थित अंतर ठेवून सरळ उभे रहा.

2. जारचे नोझल एका नाकपुडीच्या टोकावर ठेवा.

3. थोडेसे पुढे झुकून नेझल पॉट अशा प्रकारे वाकवा की मिठाचे पाणी नाकात जाईल.

4. एका नाकपुडीत ओतलेले पाणी दुसऱ्या नाकपुडीत पोचेल अशा प्रकारे शरीराचा समतोल ठेवा.

5- नोझल बाहेर काढा आणि नाकाच्या दुसऱ्या नाकपुडीतून पाणी वाहू द्या. यामुळे नाकपुड्यांमधील विषाणू आणि घाण साफ होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News