23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

तुम्ही काढता तो स्वस्तिक चुकीचा; इथं पाहा शुभ चिन्हं काढण्याची योग्य पद्धत – News18 लोकमत


मुंबई, 23 सप्टेंबर : हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे ज्यामध्ये अनेक चिन्हे पवित्र मानली जातात. यापैकी एक प्रतीक म्हणजे स्वस्तिक. अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर, पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल. आपल्या सर्वांना हे देखील माहित आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. पण तुम्हाला स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, स्वस्तिक कसे काढायचे आणि त्याचे काय फायदे आहेत.

स्वस्तिकचा अर्थ

स्वस्तिक हा शब्द तीन शब्दांपासून बनलेला आहे, ‘सु’ म्हणजे शुभ, ‘अस’- म्हणजे अस्तित्व आणि ‘के’ म्हणजे कर्ता. अशा प्रकारे स्वस्तिकाचा अर्थ शुभ आहे. स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक देखील मानले जाते आणि ज्या प्रकारे गणपतीची प्रथम पूजा केली जाते. तसेच हिंदू लोक शुभ कार्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह काढतात.

कामावर नेहमी बॉसचा ओरडा खातात या राशीचे लोक, असा करा उपाय

असे काढा स्वस्तिक

स्वस्तिक काढताना आधी एक उभी रेष काढा. त्यानंतर त्यावर आडवी रेष काढताना उभ्या रेषेला न कापता आडवी रेष काढा. कारण मधले स्थान हे ब्रह्म देवाचे स्थान साठे त्यामुळे उभिरेश कधी कापायची नाही. त्यानंतर वरच्या बाजूला, उजव्या बाजूला, खालच्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला चार रेषा काढाव्या. एवढ्यावरच स्वस्तिक संपत नाही. या चार रेषांना आणखी चार छोट्या छोट्या रेषा काढणे गरजेचे असते. त्यानंतर या स्वस्तिकमध्ये चार छोटी छोटी टीम्ब द्या.

इंस्टाग्रामवर tijtyoharshorts या नावाने एक पोस्ट आहे. यामध्ये स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत सांगितली गेली आहे. तुम्ही याप्रकारे स्वस्तिक काढू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News