12.8 C
New York
Monday, March 4, 2024

त्वचेलाच नाही तर केसांनाही डिटॉक्सची गरज असते, जाणून घ्या हे 3 सोपे उपाय


नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : केसांना चांगल्या प्रकारे डिटॉक्स करून तुम्ही त्यांना स्वच्छ आणि निरोगी ठेवू शकता. नेमके केस डिटॉक्स कसे करायचे? असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे काम तुम्ही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने सहज करू शकता. केसांना डिटॉक्स केल्याने केसांची निगा राखण्याची रोजची दिनचर्या सोपी होते.

असे केस डिटॉक्स करा –

बेकिंग सोडा –

एका भांड्यात एक कप बेकिंग सोडा आणि एक कप कोमट पाणी घ्या. आता केस ओले करा. बेकिंग सोडा आणि पाण्याचे हे मिश्रण केसांना चांगले लावा. आता केसांना हलक्या हाताने मसाज करा. 10 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा आणि कंडिशनर लावा. कंडिशनरऐवजी तुम्ही मध वापरू शकता. तुम्ही हे आठवड्यातून एकदा करू शकता. यामुळे केसांमधील कोंडा आणि अतिरिक्त तेल स्वच्छ होते.

हेे वाचा –मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही

सफरचंद सायडर व्हिनेगर –

चार कप पाण्यात अर्धा कप सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. शॅम्पू कंडिशनरच्या मदतीने केस स्वच्छ करा. यानंतर हे पाणी ओल्या केसांवर लावा आणि पुसून घ्या. केसांचे डिटॉक्सिफिकेशन होईल आणि त्यामुळे केसांमधील ऍसिडिक घटक सील करण्याचे काम होईल. यामुळे केस चमकदार आणि स्वच्छ राहतात.

हे वाचा – तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

काकडी आणि लिंबू हेअर डिटॉक्स –

एक काकडी सोलून घ्या. आता एक मोठा लिंबू कापून घ्या आणि दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात इसेन्शिअल तेलाचे काही थेंब घाला. हे मिश्रण शॅम्पूने वापरा आणि केस धुवा. यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड केसांना खोलवर स्वच्छ करते आणि स्कॅल्पला आराम देते. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News