22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

पांढरा की लाल; कोणता पेरू अधिक चांगला? रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल


मुंबई, 22 सप्टेंबर : पेरू हे असे एक फळ आहे जे स्वस्त तर आहेच पण सर्वांच्या आवडीचे आहे. पेरू हे चवीला आंबट-गोड असून ते पोटासाठी खूप फायदेशीर फळ आहे. यामध्ये काही पोषक तत्व असतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. तज्ज्ञही नेहमी आहारात हंगामी फळांचा समावेश करण्यास सांगतात. पण तुम्ही पाहिलं असेल की फक्त पांढराच नव्हे तर लाल रंगाचेही पेरू असतात. त्यामुळे जेव्हा आरोग्याचा विचार येतो तेव्हा नेमका कोणता पेरू अधिक चांगला असा प्रश्न पडतोच.

पेरूचा हंगामही आता येणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन जरूर करा. मात्र काही लोक पेरूच्या विविधतेबद्दल संभ्रमात राहतात. पांढऱ्या रंगाचे पेरू खाणे जास्त फायदेशीर आहे की लाल हे त्यांना समजत नाही. डायटीशियन शिखा कुमारी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून पेरूचे फायदेही सांगितले आहेत.

केसगळतीमुळे त्रस्त असाल तर या गोष्टी आहारात घ्या, परिणाम लगेच दिसून येईल

पेरूमध्ये असतात हे पोषक तत्व

पेरूमध्ये अँटीमाइक्रोबियल, अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, के, बी6, फोलेट, नियासिन, अँटीडायबेटिक, अतिसारविरोधी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट, आहारातील फायबर इत्यादी पोषक तत्व असतात. हे पोटाशी संबंधित समस्या टाळते. पेरू खाल्ल्याने बद्धकोष्ठता सारखी समस्या उद्भवत नाही. आहारातील फायबर असल्याने ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. अशा स्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी पेरूचे सेवन अवश्य करावे.

पांढऱ्या आणि लाल पेरूमध्ये काय फरक आहे?

– डायटीशियन शिखा कुमारी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लाल पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. साखर आणि स्टार्च कमी असते. क जीवनसत्व आणि बिया कमी किंवा बियाविरहित असतात. ते पेय म्हणून प्यायल्यास उत्तम. त्याचबरोबर पांढऱ्या पेरूमध्ये साखर, स्टार्च, व्हिटॅमिन सी आणि अधिक बिया असतात. पांढर्‍या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते आणि हे सर्व घटक लाल पेरूमध्ये त्यापेक्षाही अधिक असतात.

-लाल पेरूमध्ये कॅरोटीनॉइड नावाचे सेंद्रिय रंगद्रव्य असते. हे रंगद्रव्य गाजर आणि टोमॅटोला लाल रंग देते. कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण पेरूच्या वेगवेगळ्या जातींनुसार बदलते. यामुले ते पांढरे, हलके लाल ते गडद लाल रंगाचे असतात. त्याच वेळी पांढऱ्या पेरूमध्ये कॅरोटीनॉइड खूपच कमी असते त्यामुळे त्याला रंग येत नाही. तसेच पांढऱ्या आणि गुलाबी पेरूच्या चवीतही थोडा फरक असतो.

– ही संयुगे फळे आणि भाज्यांना लाल, केशरी, पिवळा रंग देतात. कॅरोटीनोइड्स आणि पॉलिफेनॉल ही संयुगे आहेत, जी पेरूला लाल रंग देतात. दुसरीकडे पांढऱ्या पेरूमध्ये पुरेसे कॅरोटीनोइड्स आणि पॉलिफेनॉल नसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News