22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

सात अशा मनी मॅनेजमेंट टिप्स, ज्या तुमच्या वैवाहिक जीवनात ठरतील फायदेशीर


नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : पैशाची (Money) गरज सर्वांनाच असते. जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. पैशाशी संबंधित अनेक बाबी असतात, ज्या योग्यरित्या हाताळणं खूप महत्त्वाचं आहे. जर त्या व्यवस्थित हाताळल्या नाहीत तर वैवाहिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. पैशांशी संबंधित समस्यांमुळे वैवाहिक जीवन (Married Life) असंतुलित होऊ लागतं. मात्र, लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात आणि त्यापैकी बहुतांशी पैशाशी संबंधित असतात. लग्नानंतर तुम्हाला जोडीदाराचा विचार करावा लागतो. बजेटपेक्षा जास्त खर्च होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत पैशांच्या व्यवस्थापनाशी (Money Management) संबंधित काही खास टिप्स वैवाहिक जीवनात खूप उपयोगी ठरू शकतात.

खर्चाबद्दल बोला

मॅरेज डॉट कॉमच्या मते, अशी अनेक जोडपी आहेत जी एकमेकांशी त्यांच्या खर्चाबद्दल चर्चा करत नाहीत, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये खर्च फक्त एकाच व्यक्तीवर अवलंबून असतो. त्यामुळे जोडप्यांनी खर्चाबद्दल नक्कीच बोललं पाहिजे. शिवाय जर दोघंही कमावते असतील तर भविष्यात बचत (Saving) करण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा – नशिबाची साथ हवी असेल तर ही कामे न चुकता करा, अनेक अडचणी होतील आपोआप दूर

खर्चांवर नियंत्रण ठेवा

जोडप्यांमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर एक खर्चाबद्दल विचार करत असेल तर दुसऱ्याने बचतीबद्दल विचार करायला हवा. कारण तीच बचत आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकते.

बजेट इतकाच खर्च करा

जोडप्यांसाठी लग्नानंतर बजेट (Budget) तयार करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पुढच्या आयुष्यासाठी बजेट खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर ठरवलेल्या बजेटला चिकटून राहणं म्हणजेच खर्चासाठी जेवढं बजट ठरवलंय तेवढाच खर्च करणं आवश्यक आहे.

फायनॅन्शिअल गोल सेट करा

सर्वात आधी लाईफ पार्टनरबरोबर फायनॅन्शिअल गोल सेट करा. या बजेटचा उद्देश काय आहे ते एकमेकांना सांगा. उत्पन्न कितीही असलं तरी फायनॅन्शिअल गोल सेट करणं महत्त्वाचं आहे.

बचतीकडे लक्ष द्या

कोणत्याही व्यक्तीजवळ त्याच्या गरजेइतकी बचत असणं आवश्यक आहे. जर तुम्ही विवाहित असाल, तर हे आणखी महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमच्या आवडीनुसार गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे.

पार्टनरला स्पेस द्या

नात्यात स्पेस देणं खूप गरजेचं असतं. मनी मॅनेजमेंटसाठीही हे खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक बाबींवरून एकमेकांवर दबाव टाकणं योग्य नाही.

कोणतंही सीक्रेट ठेवू नका

लग्नानंतर आपल्या खर्चाबद्दल आणि बचतीबद्दल एकमेकांशी मोकळेपणाने बोला. कारण पैशांशी संबंधित कोणत्याही प्रकारचं सीक्रेट ठेवल्यामुळे जोडप्यांमध्ये भांडणं होऊ शकतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी पैशांशी संबंधित प्रत्येक गोष्ट शेअर करणं आवश्यक आहे. जोडीदाराने असं न केल्यास नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या हाताळणं कठीण होऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News