27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांचं डोकं ठिकाण्यावर ठेवण्यासाठी देतेय 11 दिवसांची सुट्टी, या आधीही उचललं असं पाऊल


मुंबई 22 सप्टेंबर : सध्याच्या धकाधकीच्या जिवनात लोक इतके व्यस्त असतात की, त्यांना स्वत:ला देण्यासाठी आजिबात वेळ नसतो. घरचं काम आणि ऑफिसमधील काम, या सगळ्यांमध्ये लोक खूपच व्यस्त असतात. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आणि लोक बऱ्याचदा आजारी पडतात. कामाचा त्रास माणसांना शारिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारे हानी पोहोचवतं.

पूर्वी मानसिक आरोग्याविषयी इतके उघडपणे बोलले जात नव्हते, तसेच त्याला आजार म्हणूनही स्वीकारण्यास नकार देत होते, पण आज लोक त्याबद्दल जागरूक होत आहेत. जगभरातील सेलिब्रिटीही आपले अनुभव शेअर करत आहेत आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत आहेत.

शारीरिक समस्यांसाठी लोक ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकतात, पण मानसिक आरोग्यासाठी रजा घेण्याचा कायदा नाही. परंतू आता भारतीय ई-कॉमर्स कंपनी Meesho Starts Mental Health Break ने आपल्या कर्मचार्‍यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एक विशेष धोरण तयार केले आहे.

कर्मचार्‍यांना त्यांचं आयुष्य रिसेट करण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी कंपनी वर्षातून 11 दिवस सुट्टी देणार आहे.

हे वाचा : विप्रोने तर कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढलं, पण इतर IT कंपन्यांचं Moonlightingवर मत काय?

कर्मचाऱ्यांना ही सुट्टी 22 ऑक्टोबर 2022 ते 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत असेल. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे, तसेच कंपनीचं म्हणणं आहे की, ”आजकाल कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात जास्त ताण आणि काम आहे, अशा परिस्थितीत रिसेट आणि रिचार्ज कर्मचार्‍यांना चार्ज ठेवण्यासाठी हा मार्ग चांगला असेल.”

सध्या तरी कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आजारासाठी सुट्टी देत नाही, मात्र ऑनलाइन फॅशन स्टोअर मीशोने हा नवा पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे.

रिसेट आणि रिचार्ज अंतर्गत उपलब्ध रजेमध्ये कर्मचारी त्यांना हवे ते करू शकतात. मग ते त्यांच्या प्रियजनांकडे जाऊ देत, प्रवास करु देत किंवा त्यांच्या छंदासंदर्भात एखादं काम करु देत. कंपनीने भूतकाळातही कर्मचार्‍यांवर लक्ष केंद्रित करणारे असे प्रगतीशील धोरण बनवले आहे.

हे वाचा : ऑनलाइन पैसे ट्रांसफर करण्यासाठी UPI, NEFT, IMPS आणि RTGS काय आहे फायद्याचं? वाचा

2015 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीने यापूर्वी बाउंड्रीलेस वर्कप्लेस मॉडेल आणि वेलनेसणासाठी कितीही सुट्टी घेण्यासाठी मिळणार असल्याचे जाहीर केले होते. एवढेच नाही तर कंपनीने जेंडर न्यूट्रल पॅरेंटल लीव्ह देखील जाहीर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News