23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

11 दिवस काम सोडून मजा करण्याचा पगार; प्रसिद्ध भारतीय कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली स्पेशल रजा


बंगळुरू, 22 सप्टेंबर : सामान्यपणे परदेशातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एन्जॉय करण्यासाठी स्पेशल सुट्ट्या दिल्याचं तुम्हाला माहिती असेल. पण भारतात जिथं कर्मचारी मर्यादित वेळेपेक्षेही जास्त वेळ काम करतात. तिथं कंपनी किंवा बॉसने अशी खास सुट्टी देण्याची अपेक्षाच नसते. असं काही होईल याचा स्वप्नातही आपण विचार करणार नाही. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल एका प्रसिद्ध भारतीय कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मजा करण्यासाठी भरपगारी खास सुट्टी दिली आहे.

कर्मचाऱ्यांना कामाऐवजी मजा करण्याचा पगार देणारी कंपनी आहे मीशो. ऑनलाईन सेलिंग करणारी या ई-कॉमर्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांची सुट्टी जारी केली आहे. या कालावधीत कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या कामातून सुट्टी. काम सोडून त्यांना जे करायचं आहे ते करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना यासाठी पगार मिळणार आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवसात काम न करण्याची मुभा दिली म्हणून त्यांचा पगार कापला जाणार नाही. तो त्यांना दिला जाणार आहे.

हे वाचा – Job News: मोठी बातमी! या कंपनीत 9 हजार कर्मचाऱ्यांची भरती, कायम Work From Home ची सुविधा

कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून कंपनीने असं पाऊल उचललं आहे. कंपनीत वर्षभऱाच्या काही मोजक्या सुट्ट्या असतात. यात आजारपणाच्याही सुट्ट्या असतात. पण मानसिक आरोग्यासाठी सुट्ट्यांची तरतूद नाही. ही तरतूद मीशोने केली.

जगभऱातील कित्येक लोक शारीरिक आजारांसह मानसिक आजारांशी लढा देत आहे. आधी मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने बोललं जायचं नाही खऱंतर हा आजारच मानला जात नसे. पण आता याबाबत जागरूकता वाढली आहे. मानसिक आरोग्याचं महत्त्व ओळखून या कंपनीनेही असा पुढाकार घेतला.  कंपनीने खास पॉलिसीट बनवत कर्मचाऱ्यांना आपला मेंदू रिसेट आणि रिचार्ज करण्यासाठी म्हणजे मेंटल हेल्थसाठी त्यांनी ब्रेक दिला आहे.  ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मोकळं केलं. 22 ऑक्टोबर 2022 ते 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत ही सुट्टी आहे.

हे वाचा – टीसीएस, विप्रो की टेक महिंद्रा? नोकरी करण्यासाठी कोणती कंपनी अधिक चांगली?

कंपनीनेचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर संजीव बरनवला यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ते म्हणाले, सध्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तणाव आणि काम जास्त आहे. अशा स्थितीत रिसेट आणि रिचार्ज कर्मचाऱ्यांना अव्वल ठेवण्याचा मार्ग बनवेल. दुसऱ्या कंपनीही याचा अवलंब करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News