22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

अंगठ्यांमुळे बोटांवर पडणारे डाग/खुणा या घरगुती उपायांनी घालवू शकता


मुंबई, 21 सप्टेंबर : अंगठ्या आपल्या बोटांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. अनेक लोकांना एकापेक्षा जास्त अंगठ्या घालण्याचा शौक असतो. हौसेशिवाय काहीजण रत्न धारण करण्यासाठी आणि काहीजण स्टाइल म्हणून हाताच्या बोटांमध्ये अंगठ्या घालतात. मात्र, अंगठी सतत धारण केल्यामुळे बोटावर अंगठीच्या खुणा/डाग दिसतात. अंगठ्या काढलेल्या असताना ते डाग खराब दिसतात. यावर काही सोप्या पद्धतींच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत अंगठीच्या खुणा घालवू शकता. अंगठीमुळे उठणाऱ्या रिंग मार्क्स काढण्‍याच्‍या काही टिप्स आपण आज सांगत आहोत, ज्यामुळे अंगठीने उठलेले डाग सहज घालवता येवू शकतात.

सनस्क्रीन वापरा –

सहसा सूर्यकिरणांचा अंगठी घातलेल्या शरीराच्या भागावर परिणाम होत नाही. त्यामुळे अंगठीची त्वचा इतर त्वचेच्या तुलनेत गोरी राहते. यासाठी घराबाहेर पडताना हातावर सनस्क्रीन लावून टॅनिंग आणि सनबर्न टाळता येईल. ज्यामुळे तुमची बाकीची त्वचा निस्तेज होणार नाही आणि अंगठीची खूणही कळणार नाही.

लिंबू वापरा –

अंगठीच्या खुणा घालवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरून पाहू शकता. यासाठी लिंबाच्या रसात 1 चमचा मध मिसळून डागावर चोळा आणि 15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून 3 वेळा असा प्रयोग केल्याने डाग साफ होतील.

एलोवेरा जेल –

तुम्ही एलोवेरा जेलचा वापर करूनही अंगठीचे डाग घालवू शकता. यासाठी दिवसातून तीन वेळा रिंग मार्कवर कोरफडीचे जेल लावा आणि कोरडे झाल्यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमचे मार्क्स कमी होतील.

हे वाचा – जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

मॅनिक्युअर करा –

हातातील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी मॅनिक्युअर करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुमच्या अंगठीचे चिन्ह तर साफ होईलच पण हातांची त्वचाही सुधारण्यास सुरुवात होईल.

हे वाचा – ऑनलाइन फसवणूक, वीजबिल, बँकेचं काम, प्रॉपर्टी वाद, घरगुती भांडण.. कायदेशीर उत्तर

एक्सफोलिएशन वापरून पहा –

अंगठीच्या खुणा काढून टाकण्यासाठी बोटांनी एक्सफोलिएट करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे त्वचेतील मृत पेशी सहज निघून जातात आणि डाग कमी होऊ लागतात. आठवड्यातून दोनदा हात एक्सफोलिएट केल्याने तुमच्या बोटाचे डाग निघून जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News