3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

अल्झायमरची सुरुवातीची लक्षणं खूप सामान्य असतात, अशा पद्धतींनी वेळीच ओळखा – News18 लोकमत


नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : अल्झायमर हा एक मानसिक आजार आहे, जो आपल्या दैनंदिन दिनचर्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. त्याचे मुख्य लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टी व्यक्ती पुन्हा पुन्हा विसरते. म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. alz.com च्या माहितीनुसार, हा एक मेंदूचा आजार आहे, ज्याची लक्षणे कमी वयात आढळल्यास त्यावर उपचार केले जाऊ शकतात आणि व्यक्तीचे जीवन सुरळीत केले जाऊ शकते. आज 21 सप्टेंबर जागतिक अल्झायमर दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अल्झायमर रोगाची लक्षणे ओळखून त्यावर योग्य वेळी उपचार करता येऊ शकतात, याविषयी माहिती देत आहोत.

अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे –

विसरणे –

अल्झायमरचे मुख्य लक्षण हे आहे की, व्यक्ती कोणत्याही गोष्टी अगदी सहज विसरायला लागतो. काहीवेळा तो रोज करण्याची कामेही विसरू शकतो आणि विसरण्याचे चक्र पुन्हा-पुन्हा तसंच सुरू राहतं.

कोणतंही प्लॅनिंग करताना अडचणी –

अनेक वेळा अशा लोकांना त्यांचे मासिक बजेट बनवण्यात, काही योजना बनवण्यात, गोष्टींची मांडणी करण्यात अडचण येऊ लागते. म्हणजेच या लोकांना कोणतंही प्लॅनिंग करता येत नाही. अशा लोकांना गाडी चालवताना, घरातील कामे करताना, किराणा मालाची यादी बनवतानाही विसरण्याची समस्या त्रास देऊ लागते.

स्थळ आणि काळाबद्दल शंका –

अनेक लोक एखाद्या ठिकाणाबद्दल किंवा तेथे पोहचण्याच्या विशिष्ट वेळेबद्दल गोंधळून जातात. अशा परिस्थितीत ते पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी जाऊ लागतात किंवा त्यांना त्या ठिकाणी पोहोचणे कठीण जाते.

हे वाचा – जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

व्हिज्युअल कल्पना –

या आजारातील बऱ्याच लोकांना व्हिज्युअल कल्पना करण्यातही समस्या येतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी कल्पना करणे कठीण होते. अशा लोकांना सार्वजनिकरित्या बोलताना शब्दसंग्रह किंवा विषयच अचानक विसरण्याची समस्या असते.

हे वाचा – ऑनलाइन फसवणूक, वीजबिल, बँकेचं काम, प्रॉपर्टी वाद, घरगुती भांडण.. कायदेशीर उत्तर

योग्य निर्णय घेण्यात अक्षम –

अल्झायमरच्या रुग्णांना योग्य निर्णय घेण्यात अडचण येते. पैसे खर्च करताना, कुठेतरी प्रवास करताना, प्रवासाचे नियोजन करणे इत्यादींमध्येही अडचणी येतात. म्हणजे ते काहीतरी वेगळंच करून बसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News