27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

गरोदरपणात जबरदस्त औषध आहे हा ज्युस; प्रेग्न्सीतील सर्व समस्या होतील दूर – News18 लोकमत


मुंबई, 21 सप्टेंबर : गरोदरपणात आपल्याला आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आता आपले फिटनेस केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी महत्वाचे असते. या काळात आपण काय खातो, काय पितो इथपासून ते आपण कसे वागतो, काय पाहतो हेदेखील खूप महात्वाचे असते. म्हणून चा गरोदरपणात आपला आहार सांभाळणे खूप जास्त महत्वाचे असते. या अवस्थेत आपल्याला अनेक आवडत नसलेले पदार्थही खावे लागतात. कारण ते आपल्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. असाच एक पदार्थ म्हणजे कारलं.

आता कारलं म्हणलं की प्रत्येकाचं तोंड लगेच कडू होतं. गरोदरपणात कारलं आणि कारल्याचे पदार्थ आपल्यासाठी खु[प आवश्यक आणि फायदेशीर असतात. कारली खाणे किंवा कारल्याचा ज्यूस पिणे आपल्या बाळाच्या वाढीसाठी गरजेचे असते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला प्रेग्नन्सीदरम्यान कारली खाण्याचे काही अद्भुत फायदे सांगणार आहोत.

कारली व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. कारल्याचे सेवन केल्याने जुनाट मधुमेह, बद्धकोष्ठता, खोकला, दमा, जळजळ अशा अनेक रोगांपासून बचाव होतो. आता आपण जाणून घेऊया की, गर्भावस्थेत कारल्याचा ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत.

आलियाच्या बेबी शॉवरमध्ये असणार Vegan Food, पाहा गरोदरपणात व्हीगन डाएट फायदेशीर आहे का?

गर्भावस्थेत कारल्याचा ज्यूस पिण्याचे फायदे

– E Times ने दिलेल्या माहितीनुसार, कारल्यामध्ये फायबरदेखील मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आपल्याला उच्च-कॅलरी जंक फूड खाण्याची इच्छा कमी होते. यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे गर्भवती महिलांमध्ये बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीचा धोका कमी होतो.

– कारल्यामध्ये कॅरॅन्टीन आणि पॉलीपेप्टाइड-पी सारख्या पोषक तत्व मोठ्या प्रमाणात हातात. जे गर्भधारणेदरम्यान प्रेग्नन्सी डायबिटीजशी लढण्यास मदत करतात.

– कारल्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. जे गर्भावस्थेदरम्यान हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

– एका अभ्यासानुसार कारले पेरिस्टॅलिसिसला चालना देण्यास मदत करते. जे नंतर गर्भवती महिलांच्या आतड्याची हालचाल आणि पचनसंस्थेचे नियमन करण्यास मदत करते.

Oral heath : दात स्वच्छ करण्यासाठी Toothpick वापरताय? आताच बदला ही सवय, होतात हे दुष्परिणा

– गरोदरपणात खनिज म्हणून फोलेट आवश्यक आहे, कारण ते नवजात शिशूमध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट टाळते. एका अभ्यासानुसार, गर्भवती महिलांच्या दैनंदिन गरजेच्या एक चतुर्थांश फोलेट कारल्यात असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News