27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, आज जागतिक कार-फ्री-डे साजरा केला जातोय – News18 लोकमत


नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : वाढते प्रदूषण पाहता आपण वाहनांचा वापर कमीत कमी करायला हवा, पण आजच्या युगात अनेक लोकांना लांबचा प्रवास करून ऑफिसला किंवा कामासाठी जावे लागते, त्यामुळे ते शक्य होत नाही. मात्र, तरीही प्रत्येकाने आपले कर्तव्य मानून प्रदूषण कमी होण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. अनेकांना माहीत नसेल पण आज जागतिक कार फ्री दिवस आहे, असा दिवस जगभरात सगळीकडे साजरा केला जातो. या दिवशी उत्स्फुर्तपणे कार चालवली जात नाही.

काही जणांना असे वाटू शकते की, जर आपण एक दिवस कार चालवली नाही तर काय चांगलं होणार आहे. कार-फ्री-डेबद्दल अधिक जाणून घ्या.

हे वाचा – तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

कार फ्री डे का साजरा केला जातो?

कार फ्री डे दरवर्षी 22 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. त्यामागचा उद्देश ‘गाडीला आराम आणि शरीराला व्यायाम’ हा आहे. म्हणजेच, जर आपण संपूर्ण जगात फक्त एक दिवस या दिवसाचे पालन केले तर शास्त्रज्ञांच्या मते, केवळ एक दिवस कार न चालवल्यास, आपण एकीकडे लाखो टन इंधन वाचवू शकतो, तर दुसरीकडे पृथ्वीवर येणारा ताण कमी करू शकतो. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामनुसार कार फ्री डेचे जास्तीत जास्त प्रसारण करणे आवश्यक आहे.

हेे वाचा –मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही

मात्र, यासाठी केवळ एक दिवस नाही तर असे अनेक दिवस असावेत, असेही संशोधकांचे मत आहे. ज्यामध्ये लोकांना सायकल चालवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे आणि मोटार वाहनांना विश्रांती दिली पाहिजे, जेणेकरुन फक्त एक दिवस पण आपली कार बंद राहून जगाला धूरमुक्त श्वास घेता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News