22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार, या राशीने अधिक काळजी घेण्याची गरज – News18 लोकमत


आज दिनांक २० सप्टेंबर २०२२. आज मंगळवार. भाद्रपद कृष्ण दशमी. दशमी श्राद्ध. चंद्र आज दुपारनंतर कर्क राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

राशीच्या तृतीय आणि चतुर्थ स्थानात चंद्र असून गडबडीचा दिवस आहे. अनेक कष्ट होतील. घरात काही घटना घडतील. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. दिवस शुभ.

वृषभ

आज चंद्र मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. जोडीदार सोबत खरेदी होईल. प्रवास घडेल. मन आनंदी राहिलं. दिवस उत्तम.

मिथुन

राशीच्या धन स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहील. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ.

कर्क

आज व्यय आणि राशी स्थानातून होणारे चंद्र भ्रमण प्रतिष्ठा देणारे आहे. सप्तमात शनि कुरबुरी सुरू ठेवेल. खर्च करावा लागेल. रवि बुध प्रवास योग आणतील. दिवस शुभ आहे.

सिंह

राशीच्या व्यय स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक ,मानसिक आरोग्यासाठी मध्यम आहे. जोडीदाराला कष्ट राहील. खरेदी कराल.शुक्र लाभ देईल. दिवस उत्तम.

कन्या

आज लाभस्थानातील चंद्र भ्रमण शुभ असून मित्र भेट होईल. जास्तीचे काम पडेल. खर्च होण्याचे संकेत. प्रवास योग, संपर्क होतील. प्रकृती सांभाळा. दिवस चांगला आहे.

तुला

कामाच्या ठिकाणी काही महत्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये संततीशी काही विषयात मतभेद असतील. आर्थिक व्यय होण्याची शक्यता आहे .दिवस मध्यम आहे.

वृश्चिक

दुपारनंतर भाग्यस्थानातील चंद्र सुखद अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठीक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहील. दिवस बरा आहे..

धनु

आज चंद्र भ्रमण आणि शनी प्रवासाचे संकेत देत आहेत. वाहन योग येईल. आर्थिक दृष्ट्या काळ बरा आहे. जोडीदार आनंदी राहील. प्रकृती जपावी . दिवस मध्यम.

मकर

आजचा दिवस जोडीदारासोबत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस उत्तम .

कुंभ

आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. मंगळ चतुर्थ स्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिक दृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. प्रवास कराल. दिवस मध्यम जाईल.

मीन

आज घरेलु जीवन, संतती याला महत्व असेल. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस शुभ असून गुरूची उपासना करावी.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News