22.5 C
New York
Thursday, July 18, 2024
spot_img

ऋतु कोणताही असो रोज प्या कोमट पाणी, आश्चर्यचकित करणारे आहेत हे 4 फायदे – News18 लोकमत


नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जात होता. पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आपण दररोज पुरेसे पाणी प्यायले तर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो आणि आपले आरोग्यही चांगले राहते. बर्‍याचदा लोक सामान्य म्हणजे थंड पाणी पितात, परंतु गरम पाणी खरोखरच आपल्यासाठी औषधासारखे काम करते.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी नेहमी कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे. घसा आणि पोटाशी संबंधित अनेक प्रकारचे रोग आणि संक्रमण गरम पाण्याने आपल्यापासून दूर राहतात. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने केली तर ते तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया गरम पाणी आपल्यासाठी किती फायदेशीर आहे.

वजन नियंत्रण –

तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. जर तुम्ही रोज सकाळी लिंबूसोबत कोमट पाणी प्यायले तर तुम्हाला हलके वाटते. गरम पाण्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि पचनसंस्था देखील मजबूत होते.

त्वचा चमकदार होते –

जर तुम्हाला चमकदार-ग्लोईंग त्वचा हवी असेल तर एक ग्लास कोमट पाणी तुमची ही इच्छा पूर्ण करू शकते. गरम पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि त्वचेवर चमक आणते. तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा काळे डाग असतील तर ते दूर होण्यासही यामुळे मदत होते.

हे वाचा – जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

अधिक तरुण दिसाल –

असे बरेच लोक असतात, ज्यांचे वय कमी असते पण ते वयापेक्षा जास्त वयस्क दिसतात, म्हणजेच ते वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागतात. अशा समस्या टाळण्यासाठी गरम पाणी खूप फायदेशीर आहे. गरम पाणी त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते. तुम्ही महिनाभर रोज कोमट पाणी प्यायले तर तुमच्या त्वचेवर फरक दिसू लागेल.

हे वाचा – ऑनलाइन फसवणूक, वीजबिल, बँकेचं काम, प्रॉपर्टी वाद, घरगुती भांडण.. कायदेशीर उत्तर

स्नायू मजबूती –

दररोज एक ग्लास कोमट पाणी अनेक प्रकारच्या वेदना, पेटके येणे आणि रक्ताभिसरण बरे होते. ज्याप्रमाणे गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळतो, त्याचप्रमाणे गरम पाणी पिल्याने शरीराच्या मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. गरम पाणी रक्ताभिसरण संतुलित ठेवते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका दूर होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News