12.8 C
New York
Monday, March 4, 2024

ऑनलाइन फसवणूक, ऑफिसमधला त्रास, वीजबिल, बँकेचं काम, प्रॉपर्टी वाद, घरगुती भांडण तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचं कायदेशीर उत्तर – News18 लोकमत


शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. त्याला अनेक कारणं आहेत. कायद्याची माहिती नसणे, कोर्टकचेऱ्या करण्यात येणारा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळण्यासाठी लागणारा मोठा कालावधी. पण, हे मत प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. कारण, अनेक गोष्टी तुम्ही कोर्टाची पायरी न चढताच मिळवू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यास तुम्ही अगदी रुपयाही खर्च न करता कोर्टातून न्याय मिळवू शकता. आणि हिच माहिती देण्यासाठी आम्ही #कायद्याचंबोला हे सदर घेऊन आलो आहोत.

रोजच्या जीवनात आपल्यासोबत असे अनेक प्रसंग घडतात जिथं तुम्हाला कायद्याची गरज भासते. अगदी किराणा दुकानातून सामान घेण्यापासून ऑनलाईन वस्तू ऑर्डर करण्यापर्यंत कुठेही तुमची फसवणूक होऊ शकते. लाईटबीलपासून शाळेच्या फी पर्यंत आपण अनेक आर्थिक व्यवहार करतो. त्यामुळे कधीकाळी आपल्यासोबतही अशी घटना घडू शकते. तिथं आपला खिसा कापला जाईल. यावेळी तुम्हाला जर कायदा माहीत असेल तर तुम्ही घरबसल्या देखील तक्रार दाखल करुन न्याय मिळवू शकता. प्रत्येकवेळी कोर्टात जावं असं काही नाही.

सोशल मीडियाचा वापर वाढला तसं गुन्ह्यांचं स्वरुपही बदललं आहे. अनेकदा तुमच्यासोबतही काही अघटीत घटना घडली असेल किंवा घडू शकते. अशा परिस्थिती तुम्हाला कायदा माहीत असेल तर तुम्ही यातून सहज बाहेर पडू शकता. कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.

तुमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांनी कायदेशीर पद्धतीने लढलेली त्यांची लढाई त्यांच्याच शब्दात वाचा.

खात्यातून 300 रुपये झाले वजा! RBI नियमांच्या मदतीने मिळवले तब्बल 9600

पुण्यातील विद्यार्थ्याने एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पैसे न येताच 300 रूपये खात्यातून वजा झाले. यावर त्याने ‘आरबीआय’ (RBI) नियमांच्या मदतीने लढा देत तब्ब्ल 9600 रूपयांची नुकसानभरपाई मिळवली? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

नाशिकच्या तरुणाने कायद्याच्या मदतीने टिव्हीची पूर्ण रक्कम 10 टक्के व्याजाने केली वसूल

भावाने बहिणीच्या लग्नात भेट देण्यासाठी मोठ्या हौसेने ऑनलाईन टिव्ही घेतला. मात्र, तो डॅमेज निघाला. कंपनीनेही रिफंड देण्यास टाळाटाळ केली. अखेर तरुणाने स्वतः कायद्याच्या मदतीने बिलाची पूर्ण रक्कम 10 टक्के व्याजाने, मानसिक त्रासासाठी 5000 रूपये आणि तक्रार अर्ज खर्चासाठी 3000 हजार रुपये नुकसान भरपाई मिळवली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

विवाह नोंदणीसाठी गेलेल्या तरुणाचा झाला अपमान, पठ्ठ्याने ग्रामपंचायतला नियमांच्या आधारे शिकवला धडा

विवाह नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेलेल्या योगेशचा शिपायाने केलेला अपमान फार जिव्हारी लागला. त्यावर त्याने नियमांच्या आधारे ग्रामसेवकासकट शिपायाचीही खरडपट्टी काढली. शिवाय नोंदणीपत्रही मिळवलं. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

रुढी-प्रथांमुळे दीड वर्षानंतरही जन्म दाखला मिळेना

प्रशासकीय अधिकारी कायद्याशी सुसंगत निर्णय घेण्याऐवजी समाजातील पुरुषसत्ताक रुढी-परंपराचे पालन करत आहेत. त्यांच्या आडमुठ्या धोरणाचा पुरोगामी विचार करणाऱ्या कोल्हापूरच्या एका दाम्पत्याला नाहक त्रास सोसावा लागतोय. दीड वर्षानंतरही बाळाच्या जन्माचा दाखला त्यांना मिळालेला नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडणे महागात! ग्राहकाला 30 हजार नुकसान भरपाई

मार्च महिन्यात मुलांच्या परीक्षा सुरू असतानाच कोणतीही पूर्वसूचना न देता सरस्वती देवी यांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलं. याविरोधात त्यांनी कायदेशीर लढा दिल्याने त्यांना 30 हजार नुकसान भरपाई मिळाली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर सारखा पाहायचा तरुणीचे स्टेटस, 5 वर्षांचा कारावास अन्..

तो प्रत्यक्ष भेटत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे करत होता, त्याने स्वाती पुरती हादरली होती. त्यादिवसापासून ती एकही दिवस घराबाहेर पडली नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News