22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

केसांसोबतच स्कीनसाठीही बेस्ट आहे पाम तेल; वापरण्याची सोपी पद्धत घ्या – News18 लोकमत


मुंबई, 20 सप्टेंबर : त्वचा आणि केसांना सुंदर बनवण्यासाठी लोक अनेक ब्युटी प्रोडक्ट्स ट्राय करतात. पण, आपल्यापैकी अनेकांना पाम ऑइल लावण्याचे फायदे कदाचित माहीत नसतील. पाम तेल त्वचा आणि केसांसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय असल्याचे आहे. तसेच अनेक कॉस्मेटिक प्रॉडक्टसमध्ये त्याचा वापर केला जातो. पाम तेलाचा नियमित वापर त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरू (Palm oil benefits) शकतो.

पाम तेल बहुतेक उत्पादनांमध्ये जसे की शाम्पू, साबण, क्रीम आणि लोशन वापरले जाते. मात्र, या गोष्टी केमिकलयुक्त असल्याने त्वचा आणि केसांसाठीही हानिकारक असतात. म्हणून केस आणि स्कीन केअरमध्ये थेट पाम तेल वापरून आपण त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या कमी करू शकता. जाणून घेऊया त्वचा आणि केसांवर पाम तेल लावण्याचे काही आश्चर्यकारक फायदे.

केसांचा कोरडेपणा कमी होईल –

केसांवर पाम तेलाचा वापर केल्याने डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा कमी होऊ शकतो. पाम तेलामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल घटक स्कॅल्पला मॉइश्चरायझेशन ठेवण्यास तसेच ते संसर्गमुक्त करण्यासाठी उपयुक्त आहेत.

नैसर्गिक सनस्क्रीन –

उन्हाळ्यात पाम तेलाचा वापर त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्याचे काम करतो. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई समृद्ध, पाम तेल सूर्याच्या अतिनील किरणांना रोखून त्वचेला टॅनिंग, सनबर्न आणि सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.

सुरकुत्या कमी होतील –

पाम ऑइलमध्ये असलेले अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेचे वृद्धत्वाच्या लक्षणांपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे आपली त्वचा तरुण दिसते. अशा परिस्थितीत पाम तेलाचा नियमित वापर करून आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा घालवू शकता.

हे वाचा – घरबसल्या असे बनवा तुमचे मतदान ओळखपत्र, Online च्या सर्व स्टेप जाणून घ्या

त्वचेतील ओलावा कायम राहील –

पाम तेल उन्हाळ्यात त्वचेला खोल मॉइश्चरायझ करून आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करते. पाम तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के त्वचेचे पोषण करतात आणि रक्त परिसंचरण सुधारतात, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.

हे वाचा – Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password

केस दुभंगणार नाहीत –

पाम तेलामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन दुतर्फा केसांची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे. याव्यतिरिक्त, त्यात असलेले व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई केसांना आवश्यक पोषण प्रदान करून केसांची चांगली वाढ वाढवण्यास मदत करते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News