3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

डॉगी तुमचं ऐकत नाही? ट्रेनिंग देण्यात मदत करेल ‘हे’ डिव्हाईस, किंमत फक्त 200 रुपये – News18 लोकमत


मुंबई, 20 सप्टेंबर: अनेकांना कुत्रा पाळण्याची आवड असते. अनेकजण घरात कुत्राही घेऊन येतात. पण जेव्हा तो तुमचं ऐकत नाही तेव्हा समस्या येते. जेव्हा कुत्रा तुमची आज्ञा मानत नाही. यासाठी तुम्ही त्याला चांगलं प्रशिक्षण देऊ शकता. कुत्रा लहान असतानाच हे प्रशिक्षण द्यावं लागेल.

कुत्रा मोठा झाल्यानंतर प्रशिक्षण देणं खूप कठीण होतं. यासाठी तुम्ही डिव्हाईसची मदत घेऊ शकता. या डिव्हाईसच्या मदतीनं तुम्ही कुत्र्याला सहज कमांड देऊ शकता. यामुळं त्याला प्रशिक्षण देणं खूपच सोपं होतं आणि त्याला तुमच्याबद्दल बरेच काही समजू लागतं.

असं उपकरण ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करता येऊ शकतं. त्याची किंमतही जास्त नाही. तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत ट्रेनिंग डिव्हाईस खरेदी करू शकता. अशी अनेक उपकरणं अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरही मिळतील.

या उपकरणांबद्दल बोलायचं झाल्यास त्यात एक बटण असतं. हे बटन दाबल्यावर क्लिकचा आवाज येतो. तुमचा कुत्रा या प्रशिक्षित क्लिकरचा आवाज सहज ओळखू शकतो. त्यामुळे त्याला तुमची आज्ञा हळूहळू समजू लागते. कंपनीचा दावा आहे की याचा वापर घरी किंवा बिझी भागात करता येईल.

हेही वाचा: Car Seat Belt: कारमध्ये अशाप्रकारे सीट बेल्ट लावाल तरच वाचेल जीव; Photoद्वारे समजून घ्या तंत्रज्ञान

प्रशिक्षण दिले जाऊ शकतं:

या डिव्हाईसबाबत सांगण्यात आलं आहे की, बेसिक कमांड्स व्यतिरिक्त याच्या मदतानं कुत्र्याला छोट्या ट्रिक्सही शिकवल्या जाऊ शकतात. कंपनीचा दावा आहे की, ते वापरण्यास सुरक्षित आहे आणि त्यामुळं आपल्या लाडक्या पाळीव प्राण्याला कोणताही धोका होत नाही.

जेव्हा तुम्ही कुत्र्याला फिरायला घेऊन जाल तेव्हा तुम्ही हे उपकरण तुमच्यासोबत ठेवू शकता. यामुळे कुत्रे भुंकणार नाहीत. तुम्हाला फक्त क्लिकर दाबून कमांड द्यावी लागेल. यामुळे तुमच्या कुत्र्यालाही इजा होणार नाही. परंतु यामाध्यमातून तुमच्या कुत्र्याला प्रशिक्षण देण्यास थोडा वेळ लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News