12.8 C
New York
Monday, March 4, 2024

नवरात्रीत अशी करा घटस्थापना, येथे पाहा पूजा विधी आणि शुभ मुहूर्त – News18 लोकमत


मुंबई, 21 सप्टेंबर : हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

यंदा सोमवार 26 सप्टेंबरपासून नवरात्री सुरू होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते.ज्योतिषाचार्य डाॅ. कृष्ण कुमार भार्गव यांनी नवरात्रीच्या घटस्थापना मुहूर्ताबद्दल माहिती दिली आहे.

Navratri 2022: नवरात्रीत दिशेशी संबंधित या चुका करू नका, पूजा करताना हे नियम पाळा

नवरात्री 2022 तारीख

पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर रोजी पहाटे 03:23 ते 27 सप्टेंबर रोजी पहाटे 03:08 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे पूजन केले जाईल.

घटस्थापना स्थापना शुभ मुहूर्त 2022

शारदीय नवरात्रीच्या घटस्थापना किंवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.11 ते 07.51 पर्यंत आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी कलशाची स्थापना करता येत नसेल, तर तुम्ही ती अभिजीत मुहूर्तावर दुपारी 11.48 ते 12.36 या वेळेत करू शकता. अभिजीत मुहूर्त हा कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

सकाळी आहे सर्वोत्तम वेळ

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 06.11 ते 07.42 पर्यंत चोघड्याचा अमृत मुहूर्त आहे. त्यामुळे सकाळी कलशाची स्थापना करणे खूप शुभ राहील.

नवरात्रीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेनंतर दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. बहुतेक लोक या दिवशी नवरात्रीचा पहिला उपवास करतात. ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता येत नाहीत, ते पहिल्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीला उपवास करतात. याला नवरात्रीचे आरोह-अवरोह असे म्हणतात.

कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

महाष्टमीच्या दिवशी कन्यांची पूजा केली जाते आणि महानवमी किंवा दशमीला हवन केले जाते. मात्र अनेक ठिकाणी दुर्गा अष्टमीच्या दिवशी हवन केले जाते. जरी लोक पूर्ण 9 दिवस उपवास ठेवतात, तरी ते नवमी किंवा दशमीला हवन करतात आणि दसऱ्याच्या दिवशी पारण करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News