22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

फक्त दोनदा दात घासून फायदा नाही; ब्रशिंगनंतर ही महत्त्वाची स्टेप तुम्ही विसरताय – News18 लोकमत


मुंबई, 13 सप्टेंबर : आपले दात हे आपल्या पर्सनॅलिटीचा खूप महत्वाचा भाग असतात. आपले दात स्वच्छ, पांढरे शुभ्र आणि दुर्गंधीमुक्त असतील तर लोकांवर आपल्या व्यक्तिमत्वाची वेगळी छाप पडते. तसेच आपले आरोग्यही उत्तम राहते. ब्रशने तर आपण नेहमीच दात स्वच करतो. पण दातांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला ब्रशिंग व्यतिरिक्तही काही गोष्टी कराव्या लागतात. यातीलच एक पर्याय म्हणजे टीथ फ्लॉसिंग. जगभरातील दंतवैद्य दिवसातून एकदा तरी दात फ्लॉस करण्याची शिफारस करत आहेत. असे दिसून आले की, यामुळे श्वासाची दुर्गंधी रोखण्यात, पोकळी आणि हिरड्यांचे आजार टाळण्यात मदत होते.

दात फ्लॉस करण्याचे फायदे

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, फ्लॉसिंग केल्याने दातांमध्ये अडकलेली घाण सहज बाहेर येते. रोज ब्रश केल्यावरही काही लोकांचे दात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. दात घासल्यानंतरही बऱ्याचदा दातांमध्ये घाण अडकून राहाते. यासाठी तुम्ही फ्लॉस धागा वापरू शकता. फ्लॉसिंग केल्याने दातांमध्ये अडकलेले अन्न बाहेर येते आणि तोंड स्वच्छ होते. तसेच फ्लॉसिंगमुळे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होण्याची शक्यता कमी होते.

Black Coffee : ‘या’ आश्चर्यकारक फायद्यांसाठी नक्की प्यायला हवी ब्लॅक कॉफी, ही असते योग्य वेळ

दात कसे फ्लॉस करावे?

दात फ्लॉस करण्यासाठी रेशीम किंवा सामान्य पातळ धागा घ्या. यानंतर धाग्याची दोन्ही टोके हाताने धरून ठेवा. मग धागा दातांमध्ये अडकवा आणि वरपासून खालपर्यंत घासून घ्या. असे केल्याने दातांमध्ये अडकलेली घाण साफ होते. याशिवाय फ्लॉसिंग धागा गम लाइनच्या खाली सरकवा. यामुळे दात अगदी स्वच्छ होतात. फ्लॉसिंग केल्यानंतर तोंड पाण्याने किंवा माउथवॉशने स्वच्छ करा. असे केल्याने तुमचे तोंड पूर्णपणे स्वच्छ होईल आणि दुर्गंधीही कमी होईल.

Diabetic Diet: डायबिटीज असणाऱ्यांच्या ताटात रात्री हे पदार्थ हवेत; शुगर नियंत्रित राहील

प्रत्येकवेळी जेवणानंतर दात घासणे सोयीचे नसले तरी जेवणानंतर फ्लॉस करणे सोपे आहे आणि ते कुठेही केले जाऊ शकते. तसेच यामुळे मौखिक स्वच्छतेबरोबरच, निरोगी आहार आणि जीवनशैली राखण्यातही मदत होते. कारण असेही मानले जाते की, खाल्ल्यानंतर फ्लॉसिंग केल्याने तुम्हाला स्नॅक खाण्याचा मोह कमी होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News