23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

वृद्धावस्थेत निरोगी राहण्यासाठी आहारात ‘हे’ पदार्थ हवेतच – News18 लोकमत


मुंबई, 19 सप्टेंबर :  सध्याच्या काळात जेवणाच्या अनियमित वेळा आणि कामाचा ताण यामुळे लहान वयातच तब्येतीच्या तक्रारी डोकं वर काढतात. त्यामुळे म्हातारपणी त्यामध्ये खूपच वाढ होत जाते. नियमित व्यायाम, चालणं, योग आदी करत असल्यास शरीर फिट राहतं. म्हातारपणीच्या आरोग्याच्या तक्रारी टाळण्यासाठी व्यायामासोबत संतुलित आहारदेखील महत्त्वाचा आहे. चुकीच्या डाएटचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आपला आहार कसा असावा याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. वृद्धापकाळातल्या आहाराबद्दल अधिक माहिती घेऊ या.

अंडी

अंड्यांमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण खूप असतं. म्हातारपणात शरीरात प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात जाणं गरजेचं आहे. वृद्धांच्या शरीरात प्रोटीन्सचं प्रमाण कमी झाल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवतात. म्हणून आहारात अंडी ठेवावीत. अंडं उकडवून खाता येतं. तसंच अंड्याचं ऑम्लेटही अनेकांना आवडतं. अंड्यांच्या नियमित सेवनाने शरीरात ऊर्जा कायम राहते. तसंच हाडं मजबूत राखण्यास उपयोग होतो. हृदयाशी संबंधित आजारांना प्रतिबंध करता येतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास अंडी खाणं उपयुक्त ठरतं.

हेही वाचा – Oral heath : दात स्वच्छ करण्यासाठी Toothpick वापरताय? आताच बदला ही सवय, होतात हे दुष्परिणाम

मासे

मासे खाल्ल्याने प्रकृतीच्या तक्रारींना दूर ठेवता येतं. माशामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतं. यामुळे हृदयाशी निगडीत समस्या दूर राहतात. बुद्धी तल्लख राखण्यास आणि डोळ्यांच्या तक्रारी दूर करण्यासही मासे खाणं उपयुक्त ठरतं. तसंच स्मरणशक्तीही उत्तम राहते.

फायबरयुक्त पदार्थ

फायबरयुक्त पदार्थ म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या आहारात असणं शरीरासाठी उपकारक ठरतं. पचनशक्ती सक्षम राखण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थ असणं गरजेचं आहे. विविध भाज्या, फळं आणि डाळी आहारात हव्यात, जेणेकरून पचनशक्ती चांगली राहते आणि वारंवार भूकही लागत नाही. त्यामुळे अतिरिक्त आहारावर नियंत्रण येतं. फायबरयुक्त पदार्थ रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतात. तसंच शरीरातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाणही संतुलित ठेवतात.

दही

दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असतं. तसंच शरीराला उपयुक्त असे जिवाणूही दह्यात असतात. दह्यामध्ये झिंक, व्हिटॅमिन बी, प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन डी असतं. त्यामुळे हाडं मजबूत राहतात. वृद्धापकाळातला सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. म्हणून कॅल्शियम असलेले पदार्थ आहारात असणं गरजेचं आहे.

वृद्धापकाळातल्या आरोग्याच्या तक्रारींचा बीमोड व्हावा यासाठी आहार सर्वसमावेशक आणि संतुलित हवा. म्हणूनच डॉक्टरांच्या किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार ठरवून घ्यावा आणि त्यानुसार अंमलबजावणी करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News