22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

हिरड्यांमधून रक्त येतंय?; उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या – News18 लोकमत


नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : आजकाल बहुसंख्य लोक हाय ब्लड शुगर लेव्हल (High Blood Sugar Level) म्हणजेच डायबेटिसच्या (Diabetes) समस्येने त्रस्त आहेत. बदलती जीवनशैली (Lifestyle)आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डायबेटिससह अनेक आजारांनी लोकांना घेरलं आहे. या आजारांपासून मुक्त होण्यासाठी लोक बरंच काय काय करत असतात. डायबेटिसचे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात, ज्यामध्ये रुग्णाचे तोंड आणि ओरल हेल्थवर सर्वाधिक परिणाम होतो. डायबेटिसच्या रुग्णांमध्ये हिरड्यांचे आजार, कॅव्हिटी यांसारख्या समस्या होऊ शकतात, पुढे त्या जास्त गंभीरदेखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत डायबेटिसने त्रस्त असलेल्या लोकांनी तोंडाच्या आरोग्याबाबत जागरुक राहायला हवे. तोंडात दात आणि हिरड्या व्यवस्थित स्वच्छ ठेवल्यास डायबेटिससोबतच हृदय (Heart) आणि किडनीशी (Kidney) संबंधित समस्याही कमी होऊ शकतात. डायबेटिसचा तोंडाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

डेंटल समस्या उद्भवू शकतात

NIDDK.NIH नुसार, आपल्या तोंडात असलेली लाळ हा एक द्रव पदार्थ आहे, जो अन्नाला ब्रेकडाऊन करून द्रवरूपात रूपांतरित करून तोंडात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतो. तोंडाची लाळ बॅक्टेरियाशी लढून तोंडातील कॅव्हिटी आणि कीड रोखते. जेव्हा तुम्ही डायबेटिसने ग्रस्त असता, तेव्हा लाळेतील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. जे अन्नातील बॅक्टेरियांबरोबर मिळून एक चिकट पदार्थ तयार करतात, ज्याला आपण प्लाक असं म्हणतो. जास्त काळापर्यंत प्लाक जमा झाल्यामुळे हिरड्यांची गंभीर समस्या उद्भवू शकते. तज्ज्ञांच्या मते, डायबेटिसवरील औषधांमुळे रुग्णांच्या दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्या किडण्याचा धोकाही खूप जास्त असतो.

हेही वाचा –  Oral heath : दात स्वच्छ करण्यासाठी Toothpick वापरताय? आताच बदला ही सवय, होतात हे दुष्परिणाम

डायबेटिसमुळे होणाऱ्या तोंडाच्या समस्या

– ड्राय माऊथ आणि डायबेटिसमुळे तोंडात लाळ कमी बनते, ज्यामुळे तोंडात फोड, अल्सर आणि इन्फेक्शन होऊ शकते.

– थ्रश हा तोंडात होणारा संसर्ग आहे, ज्यामध्ये पांढरे डाग पडून खूप वेदना होतात.

– बर्निंग माउथ सिंड्रोममध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे तोंडात जळजळ होते.

– डायबेटिसमध्ये खाण्यापिण्याची चव खराब आणि बदललेली वाटू शकते.

– तोंडाच्या या सर्व समस्यांमुळे मधुमेहासाठी योग्य डाएट प्लॅन पाळण्यात किंवा खाण्यापिण्यात समस्या निर्माण करू शकतात.

भारतात मोठ्या संख्येने लोक डायबेटिसने ग्रस्त आहेत. मधुमेहाचं वाढतं प्रमाण आणि रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. या रुग्णांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तोंडाच्या अनेक समस्या त्यांना होतात. त्यामुळे विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News