22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Heart attack चा इतका मोठा झटका; पन्नाशी गाठलेला ‘तो’ 25 वर्षांचा तरुण दिसू लागला


लंडन, 20 सप्टेंबर : हार्ट अटॅक ज्यामुळे क्षणात कुणाचाही जीव जाऊ शकतो. पण याच हार्ट अटॅकमधून एक व्यक्ती बचावली पण हार्ट अटॅक या व्यक्तीला इतका मोठा झटका बसला त्यामुळे तिचं आयुष्यच पूर्णपणे बदललं. वयाची पन्नाशी गाठलेली ही व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्यानंतर अचानक 25 वर्षांच्या तरुणासारखी दिसू लागली. हार्ट अटॅकच्या त्या दिवसानंतर वर्षभरात या व्यक्तीमध्ये आश्चर्यकारक बदल झाला.

ब्रिटनमधील 54 वर्षांचा रिचर्ड गोल्डन 5 मुलांचा बाबा आणि 2 नातवंडाचा आजोबा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याला हार्ट अटॅक आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. सुदैवाने त्याचा जीव वाचला. पण एका हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं.

जेव्हा रिचर्डला हार्ट अटॅक आला तेव्हा त्याचं वजन 95 किलो होतं. तो लठ्ठ होता. रिचर्ड सांगितल्यानुसार तो इतका लठ्ठ होता की लग्नाची अंगठीही त्याला होत नव्हती. हा लठ्ठपणाच त्यासाठी कारणीभूत ठरला. पण त्यानंतर त्याने आपली स्थिती सांभळण्याचं निश्चय केला आणि तसा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नांना यशही आलं.

हे वाचा – Excercise करताना एक छोटीशी चूक आणि तडफडू लागला तरुण; Gym मधील धडकी भरवणारा VIDEO

रिचर्ड दररोज ऑफिसवरून घरी आल्यावर तो ब्रँडी प्यायचा. पण वजन कमी करण्यासाठी त्याने दारू पूर्णपणे बंद केली. स्वतःसाठी एक पर्सनल ट्रेनर ठेवला. ज्याच्या मदतीने तो एक्सरसाइझ करू लागला. रिचर्ड सांगतो, एक्सरसाइझ सुरू केली तेव्हा पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये हेच त्याचं ध्येय होतं. त्याने स्वतःमध्ये बदल घडवला.

एक वर्षे मेहनत करून त्याने आपलं वजन कमी केलं. वर्षभरातच 20 किलो वजन कमी केलं.  95 किलोवरून तो आता 76 किलोचा झाला.  आता त्याचं शरीर 25 वर्षांच्या तरुणासारखं दिसतं.

हे वाचा – 66 वर्षांच्या आजीबाईंनी केला नको तो प्रताप; पाहून डॉक्टरांनाही फुटला घाम

त्यानंतर त्याने आता दारू पूर्णपणे सोडली. आपल्या कुटुंबातील सर्वांना तो जिममध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्याच्यातील हा बदल पाहून  त्याची बायकोही खूप आनंदी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News