12.8 C
New York
Monday, March 4, 2024

आर्थिक लाभ होणार; ‘या’ व्यक्तींच्या राशीत घर, गाडी खरेदीचाही योग – News18 लोकमत


आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 सोमवार. आज भाद्रपद कृष्ण नवमी. अविधवा नवमी श्राद्ध. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करेल. चंद्र गुरू केंद्र योग निर्माण होईल. आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज तृतीय चंद्र काही विशेष कामासाठी कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. काही विशेष काम हातून घडेल. चंद्र गुरू केंद्र योग आहे. मानसिक स्वास्थ्य मिळेल. दिवस उत्तम.

वृषभ

आज दिवस भाग्यदायक असून महत्त्वाचे निरोप मिळतील. मौल्यवान खरेदी, आर्थिक लाभ होतील. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. राशीत मंगळ आहे. तरी सावध रहा. दिवस शुभ.

मिथुन

सावध राहण्याचा दिवस. आर्थिक लाभ होईल. तृतीय स्थानात शुक्र आहे. प्रवास खर्च भरपूर होईल. घरात काही तणावाची स्थिती राहिल. महत्त्वाचे निर्णय टाळा. दिवस मध्यम.

कर्क

आज प्रकृती ठिक राहिल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराची काळजी घ्या. ईश्वराची उपासना सर्व संकटातून मार्ग काढेल. चंद्र गुरू योग मानसिक स्वास्थ्य देईल. दिवस चांगला आहे.

सिंह

शत्रू डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतील. पण शनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल. चंद्र जोडीदाराला आर्थिक लाभ दाखवत आहे. आरोग्य चिंता वाटेल. दिवस उत्तम.

कन्या

संततीला नवीन संधी प्राप्त होतील. मानसिक चिंता वाटेल. आर्थिक आणि शारीरिक व्याधी कमी होतील. काम वाढेल पण कार्यक्षेत्रात नाव मिळेल. दिवस उत्तम.

तूळ 

गृह, नवीन वाहन याचे योग येतील. कुठेही अनावश्यक धाडस करू नये. भाग्य चंद्र कार्यक्षेत्रात विशेष घटना घडवील. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आठवा मंगळ आहे. दिवस उत्तम.

वृश्चिक

आज अचानक भावंडासंबंधी काही काळजी वाटेल. आर्थिक घडामोडी होतील. बंधुभगिनी भेट होईल. जास्तीचे काम पडेल. पण भाग्य साथ देईल. वादविवाद टाळा. दिवस मध्यम.

धनु

आज अनेक ठिकाणाहून जबाबदाऱ्या येतील. आर्थिक चिंता दूर झाली तरी खर्च जपून करा. प्रवास योग आहे. वैवाहिक सुख लाभेल. दिवस उत्तम.

मकर

गुरू आणि चंद्र षष्ठ स्थानात अनेक संमिश्र फळ देणार आहेत. फार ताण घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास होईल. जोडीदाराला कठीण काळ. आर्थिक प्राप्ती बरी राहिल. दिवस उत्तम.

कुंभ

जपून रहा. फार महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. संतती आनंदी राहिल. देवदर्शन घडेल. दिवस उत्तम.

मीन

कुटुंबियांच्या समवेत दिवस जाईल. काही तरी विशेष करून दाखवाल. लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल. घरात जास्त काम पडेल. आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस आहे. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News