27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय, पण सोडिअमदेखील हवंय; हे पदार्थ आहेत उत्तम पर्याय


मुंबई, 18 सप्टेंबर : उत्तम आरोग्य राखण्यासाठी, शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात असणे फार महत्वाचे आहे. सोडियम हे असेच एक खनिज आहे, जे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. मानवी शरीराला नर्व्ह पल्सेस कंडक्ट करण्यासाठी, स्नायूंना आकुंचन आणि आराम देण्यासाठी आणि पाणी आणि खनिजांचे योग्य संतुलन राखण्यासाठी विशिष्ट प्रमाणात सोडियमची आवश्यकता असते.

या महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आपल्याला दररोज सुमारे 500 मिलीग्राम सोडियमची आवश्यकता असते. आपल्याला बहुतेक सोडियम सामान्य मिठापासून मिळते. मीठ, ज्याला सोडियम क्लोराईड देखील म्हणतात. त्यात सुमारे 40% सोडियम आणि 60% क्लोराईड आहे. तुमच्या रक्तातील सोडियम खूप कमी असल्यास, तुम्हाला हायपोनाट्रेमियाचा त्रास होऊ शकतो, जो अंतर्निहित वैद्यकीय स्थितीमुळे किंवा जास्त पाणी पिण्यामुळे होऊ शकतो.

छोट्या वाटणाऱ्या या 4 चुका तरुणांच्या चेहऱ्याचा स्मार्टनेस घालवतात; आजपासूनच बदला

असे झाल्यावर शरीरातील पाण्याची पातळी वाढू लागते. परिणामी तुमच्या पेशी फुगायला लागतात. ही सूज तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. काहीवेळा हायपोनेट्रेमिया घातकदेखील ठरू शकतो.

शरीरात सोडियमच्या कमतरतेची लक्षणे

– मळमळ आणि उलटी

– डोकेदुखी

– भ्रम

– थकवा, शरीराची ऊर्जा कमी होणे

– स्नायू कमकुवत होणे, पेटके येणे

– अस्वस्थता आणि चिडचिड

सोडियमसाठी आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, खालील काही पदार्थ सोडियमचे कमतरता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

कॉटेज चीज : हे कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. 100 ग्रॅम चीजमध्ये सुमारे 300 मिलीग्राम सोडियम असते, जे दररोजच्या गरजेच्या सुमारे 12 टक्के असते. या पनीरमध्ये असलेले मीठ जेवणाची चव सुधारते.

सी फूड : हे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. सी फूड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. चांगल्या पद्धतीने शिजवल्यास सी फूडमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. परंतु सी फूड काळजीपूर्वक निवडणे महत्वाचे आहे. कारण शेलफिश आणि कॅन केलेला ट्यूना फिश यांमध्ये जास्त मीठ असते. याउलट ताजे ट्यूना, सॅल्मन, हॅलिबट आणि हॅडॉक हे सर्वोत्तम सीफूड आहे.

कॅन्ड मीट : कॅन केलेल्या मांसामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, 100 ग्रॅम चिकन आणि टर्कीमध्ये 50 मिलीग्राम सोडियम असू शकते. तर लाल मांसामध्ये याचे प्रमाण जास्त असते. शरीराला आवश्यक तेवढेच सोडियम खावे.

डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

ताज्या भाज्यांचा ज्यूस : शरीरातील सोडियमची कमतरता नैसर्गिकरित्या पूर्ण करायची असेल, तर भाज्यांचा ज्यूस हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र ताज्या भाज्यांचा ज्यूस पिण्याचा प्रयत्न करा आणि बाजारात उपलब्ध असलेले पॅकेज केलेले ज्युसेस टाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News