27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

कितीही ठरवलं तरी सकाळी लवकर उठता येत नाही? मग ‘या’ ट्रीक्स करा, नक्कीच होईल फायदा


मुंबई 19 सप्टेंबर : खराब जिवनशैलीचा प्रभाव आपल्यावर आरोग्यावर पडतो, ज्यामुळे आपला संपूर्ण दिवस खराब जातो. यासाठी लवकर उठणे किंवा व्यायाम करणे केव्हा ही चांगले. परंतू अनेकदा होतं असं की, लवकर उठावेसे वाटते. परंतू तरी देखील सकाळी उठता येत नाही. कितीही अलार्म लावला तरी देखील सकाळी उठायलाच होत नाही. बऱ्याचदा लोक 5 मिनिटे, आणखी 5 मिनिटे असं करुन आलार्म पुढे ढकलतात, मात्र ते काही सकाळी लवकर उठत नाहीत.

याचा अर्थातच कामावर किंवा इतर गोष्टींवर परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्याचे पालन करून तुम्ही सकाळी लवकर उठू शकता. चला जाणून घेऊ.

हे वाचा : Good Morning Wishes: दिवसाची सुरुवात करा खास! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे सुंदर ‘गुड मॉर्निंग’ संदेश

सकाळी लवकर कसे उठायचे?

तुम्ही झोपण्यापूर्वी किमान 6 ते 7 तास चहा आणि कॉफी पिऊ नये. हे प्यायल्याने झोप येत नाही आणि झोपेचं चक्र विस्कळीत होतं, ज्यामुळे सकाळी उठण्यास त्रास होतो.

झोपण्यापूर्वी मोबाईल आपल्यापासून लांब ठेवा, तसेच टीव्ही बघणं देखील सोडा. दुसऱ्या दिवशी वेळेवर उठण्यासाठी आदल्या रात्री पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. झोपण्यापूर्वी स्क्रीनवर वेळ घालवल्याने तुमची झोप उडू शकते, तसेच डोळ्याला त्रास होऊ शकतो.

झोपण्यापूर्वी मन शांत असणे खूप गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी हलके संगीत किंवा मंत्र ऐकल्यास चांगली झोप येते. म्यूजीक एक चांगली थेरपी आहे. त्यामुळे ते ऐकल्याने मनाला शांती मिळते आणि चांगली झोप देखील लागते.

हे वाचा : Kidney Stone Home Remedy : तुळशीच्या पानानेच गायब होईल किडनी स्टोन; अशा पद्धतीने करा वापर

या सगळ्या गोष्टींच्या दररोजच्या वापरामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठायला मदत होईल.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News