22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

घरामध्ये दिशेनुसार लावा या रंगाचा पडदा; आर्थिक संकटं संपून घरी येईल ऐश्वर्य – News18 लोकमत


मुंबई, 19 सप्टेंबर : वास्तुशास्त्रात केवळ योग्य दिशांचेच महत्त्व सांगितलेले नाही. तर घराच्या भिंती आणि पडद्यांच्या रंगांचेही महत्त्व सांगितलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील किचन, बेडरूम आणि पूजेच्या घराचे जितके महत्त्व आहे. तितकेच महत्व घरातील पडद्यांच्या रंगांचेही आहे. रंगांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.

घराला रंग देतानाही रंगांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. याशिवाय घरातील पडदे, चादरी, उशा आणि बेड कव्हर हेही भिंतींच्या रंगानुसार असावेत असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. इंदूर येथे राहणारे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा, यांनी संदर्भात अधिक माहिती दिली आहे.

Dream Meaning : मनी वसे ते स्वप्नी दिसे; पण स्वप्नात जोडीदार दिसण्याचा समजून घ्या खरा अर्थ

दक्षिण दिशा

घरातील पडदे आणि त्यांचा रंग आपल्या अनेक समस्या दूर करू शकतो असे वास्तुशास्त्राचे मत आहे. वास्तूनुसार, आपण आपल्या घरातील दिशांनुसार पडद्यांचा रंग निवडला पाहिजे. जर कुटुंबात कलह होत असेल किंवा घरातील लोकांमध्ये आपसात दुरावा निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीत व्यक्तीने घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचे पडदे लावावेत. असे मानले जाते की लाल पडद्याचा वापर केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि घरात शांतता येते.

उत्तर दिशा

माहितीनुसार घराच्या पडद्यांचा रंग निवडल्यास व्यक्ती आर्थिक संकटातूनही मुक्त होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर त्या व्यक्तीने घराच्या उत्तर दिशेला निळे पडदे लावावेत. वास्तुशास्त्राचे मत आहे की यामुळे माणूस कर्जमुक्त होतो आणि घरात पैसा येऊ लागतो. निळा रंग समृद्धी आणि आरामाचा रंग मानला जातो.

पश्चिम दिशा

अनेकांना मेहनत करूनही योग्य फळ मिळत नाही. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला पांढरे पडदे लावा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल असा वास्तुशास्त्राचा विश्वास आहे. पांढरा रंग हा शांतीचा रंग मानला जातो. याशिवाय जर तुमची बेडरूम वायव्य किंवा पश्चिम दिशेला असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या खिडक्या किंवा दारांवर क्रीम किंवा पांढरे पडदे वापरू शकता.

घरात अशा घटना घडणं अशुभ; अडचणी वाढणे, आर्थिक स्थिती बिघडण्याचे असतात ते संकेत

पूर्व दिशा

वास्तुशास्त्रानुसार, अनेक लोक नोकरीच्या शोधात भटकत राहतात. परंतु त्यांना त्यात यश मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीसोबत असे होत असेल तर त्याने घराच्या पूर्व दिशेला हिरवे पडदे लावावेत. हिरवा रंग वाढीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रासोबतच हा रंग ज्योतिषशास्त्रातही शुभ मानला जातो. घरामध्ये या रंगाचे पडदे वापरल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News