23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

टेस्टमध्ये बेस्ट! चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध आहेत नाशिकमधील ‘ही’ रेस्टॉरंट, खवैय्याना लावलंय वेड – News18 लोकमत


मुंबई, 19 सप्टेंबर: जगण्यासाठी जेवण तर आपण नेहमीच करतो. पण जेवण केवळ जिवंत ठेवण्यासाठी करावं का? चविष्ट जेवण खाणं हा प्रकारचा विरंगुळा असतो. अनेक लोकांचा ताण कमी करायला चांगल्या प्रकारचं चविष्ट जेवण उपयुक्त ठरतं. अनेक लोक खवैय्ये असतात. असे लोकांना तर नवनवीन पदार्थांची चव चाखण्यात स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळते. नाशिक हे  शहर पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून जवळ असलेलं महत्त्वाचं शहर आहे. अनेक कारणांमुळं लोक नाशिकला जात असतात. अशा वेळी नाशिकमधील या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

तसं पाहायला गेलं तर एखाद्या चांगल्या हॉटेलात जाऊन मस्तपैकी चमचमीत जेवणावर ताव मारावा, अशी केवळ खवैय्यांचीच नाही तर सर्वांचीच इच्छा असते, परंतु प्रत्येकजण कामाच्या धबडग्यात अडकून पडलेला असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त धावपळच सुरु असते. काम, शिक्षण व्यवसाय यामध्ये दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो याचा पत्तादेखील लागत नाही. दररोजचं काम, त्यासाठी करावा लागणारा प्रवास, कामाचा ताण इत्यादी गोष्टीमुळं लोकांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. खासकरून मुंबई, पुण्यासारख्या शहरात कामाच्या ताणाखाली लोक आपलं स्वत्वच हरवून बसतात. त्यामुळं लोकांना सुखानं श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. परंतु तरीही तुम्ही आठवड्यातून एखाद्या दिवशी चांगल्या हॉटेलला जाऊन जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. यापूर्वी आपण पुणे (Restaurants Near Pune Station)  आणि मुंबईमधील महत्त्वाच्या परिसरातील हॉटेल्सची (Restaurants Near Mumbai) माहिती घेतली. आज आपण नाशिक शहरातील काही बेस्ट रेस्टॉरंटची माहिती घेऊया.

Best Restaurant in Nashik

तुमच्या शहरातून (नाशिक)

1. बारबेक्यू नेशन, सिटी सेंटर मॉल (Barbeque Nation):

पत्ता: 2रा मजला, सिटी सेंटर मॉल संबाजी चौक, लवटे नगर बन्यान स्क्वेर, उंटवाडी रोड , नाशिक , महाराष्ट्रा  422009

फोन: 080 6902 8738

 2. स्पाईस रुट (Spice Route):

पत्ता: 2, गंगापूर रोड, युनियन बँकेच्या मागे, नवश्या गणपती परिसार, गणपती नगर , आनंदवल्ली , नाशिक , महाराष्ट्रा  422013

फोन: 099229 92231

3. याहू हॉटेल (Hotel Yahoo):

पत्ता: याहू हॉटेल, शरणपूर लिंक आरडी, तिबेटन मार्केट जवळ, कॅनडा कॉर्नर जवळ, पी अँड टी कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र 422005

फोन: 0253 257 1748

हेही वाचा: Best Hotel Management colleges in Nashik: शिक्षण आणि प्लेसमेंट्समध्ये अव्वल; नाशिकमधील टॉप इन्स्टिट्यूट्स

4. व्हेज आरोमा (Veg Aroma):

पत्ता: गंगापूर रोड, काळे नगर, विवेका नंद नगर, आनंदवल्ली , नाशिक , महाराष्ट्रा  422005

फोन: 0253 233 9696

5. रिव्हर डाईन रेस्टॉरंट (River Dine Restaurant & Banquet):

पत्ता: आसाराम बापू आश्रम ब्रिज समोर, नंदवन लॉन्स जवळ, सावरकर नगर एक्स्टेंशन, गंगापूर रोड , नाशिक , महाराष्ट्र  422013

फोन: 099232 73444

6. हाजी दरबार रेस्टॉरंट (Haji Darbar Restaurant):

फाळके रोड, लोखंड बाजार, कोकणीपुरा, नाशिक, महाराष्ट्र 422001

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News