22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

दात स्वच्छ करण्यासाठी Toothpick वापरताय? आताच बदला ही सवय, होतात हे दुष्परिणाम – News18 लोकमत


मुंबई, 18 सप्टेंबर : दैनंदिन कामांमध्ये आपण जेवढे लक्ष आपल्या शारीरिक स्वच्छतेकडे देतो. तितके आपण आपल्या ओरल हेल्थकडे देत नाही. मात्र हेदेखील शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. काही लोक दातांची योग्यप्रकारे काळजी न घेता. काही चुकीच्या पर्यायांचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करतात. दात आणि तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्याच्यावेळी ब्रश करणे आवश्यक असते.

मात्र काही लोक रात्री ब्रश करण्याऐवजी दातातील अडकलेले अन्न पदार्थ काढण्यासाठी मॅचस्टीक्स किंवा टुथपिकचा वापर करतात. काहीवेळा टूथपिक वापरने ठीक आहे. मात्र सतत जर तुम्ही दातातील अन्न पदार्थ काढण्यासाठी टुथपिकचा वापर करत असाल तर ते तुमच्या दातांसाठी आणि तोंडाच्या रोग्यांसाठी हानिकारक ठरू शकते. कारण यामुळे हिरड्यांशी संबंधित विविध समस्या उद्भवतात. टूथपिकमुळे हिरड्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो आणि तोंडाच्या रूट कॅनाल आणि दातांच्या संरचनेलादेखील नुकसान होऊ शकते.

टुथपिकमुळे होनारे दातांचे नुकसान

दातांमध्ये गॅप : टूथपिक्सचा जास्त वापर केल्याने तुमच्या दातांमध्ये गॅप येऊ शकतो. ज्यामुळे हिरड्या सुजणे आणि दुखण्याची समस्या वाढते. त्याचबरोबर या गॅपमुळे दातांमध्ये आणखी जास्त प्रमाणात अन्न पदार्थ अडकण्याची शक्यताही वाढते.

डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

कमकुवत दात : टूथपिक किंवा मॅचस्टिकने दात स्वच्छ केल्याने किंवा दातातील अन्न पदार्थ काढल्याने तुमच्या दातांच्या इनॅमलच्या थराला नुकसान होते आणि शेवटी त्यामुळे दात कमकुवत होतात.

दातांच्या मुळांना इजा : टूथपिक्सचा वारंवार वापर केल्याने तुमच्या दातांच्या मुळांना हानी पोहोचते. टूथपिक वापरताना, तुटलेल्या टूथपिकचा एक तुकडा जरी तुमच्या हिरड्यांमध्ये अडकला तरी ते मुळातील सेल्सला खोलवर नुकसान पोहोचवते.

हिरड्यामधून रक्तस्त्राव : हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असल्यास डेंटिस्ट सहसा लोकांना टूथपिक्स न वापरण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आणखी नुकसान किंवा जखम होऊ शकतात.

दातांच्या स्वच्छतेसाठी टुथपिकऐवजी करा हे उपाय

– टूथपिक किंवा मॅचस्टिकने दात स्वच्छ करण्याची सवय सोडून देणे केव्हाही चांगले. त्याऐवजी तुमच्या दातांमध्ये अडकलेले अन्न काढून टाकण्यासाठी तुम्ही कडुनिंबाची दातून स्टिक वापरू शकता. कारण कडुलिंब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते आणि ते तुमच्या तोंडाच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही.

तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

– लंच आणि डिनर नंतर दात घासण्याची सवय लावा. कारण यामुळे तुमच्या दातातील अडकलेले अन्न कण सहज निघून जातात. त्याचबरोबर दातांच्या आणि तोंडाच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी मीठासह कोमट पाण्याचा वापर केल्याने हिरड्या चांगल्या राहण्यास मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News