27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचं कसं असतं भविष्य? स्वभावाचे हे गुण असतात खास – News18 लोकमत


मुंबई, 13 सप्टेंबर : आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्या समस्या दूर करण्यासाठी पितृ पक्षात पृथ्वीवर येतात, असे हिंदू पौराणिक कथांमध्ये सांगितले गेले आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाच्या वेळी सर्वजण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्यासाठी पिंडदान-दानधर्माचे पालन करतात. पितृपक्ष सध्या सुरू असून तो 25 सप्टेंबर 2022 पर्यंत चालणार (Pitru Paksha 2022) आहे. या काळात जन्मलेल्या मुलाचे भविष्य काय असेल, त्या मुलाचा स्वभाव कसा असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया.

पितृपक्षात जन्मलेली मुले भाग्यवान –

ज्योतिषांच्या मते, पितृ पक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नसले तरी या दिवशी जन्मलेली मुले खूप शुभ आणि भाग्यवान असतात. पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की, अशी मुले त्यांच्याच कुळातील पूर्वज असतात. ही मुले कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम करतात. अशी मुले घरातील सदस्यांना नेहमीच महत्त्व देतात.

मुलांचा स्वभाव

शास्त्रानुसार पितृ पक्षात जन्मलेली मुले खूप सृजनशील असतात. अशा मुलांचा जन्म एका खास उद्देशासाठी होतो. अशी मुले अतिशय आनंदी स्वभावाची असतात. त्याला आपल्या कुटुंबाबद्दल खूप आपुलकी असते.

हे वाचा –  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

सकारात्मक विचार करण्यासोबतच ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. ही मुले अगदी लहान वयातच मोठे यश मिळवतात. तथापि, पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत स्थितीत असतो, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही अडथळे येतात. मात्र, ज्योतिषीय उपायांनी चंद्र मजबूत केला जाऊ शकतो.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News