12.8 C
New York
Monday, March 4, 2024

यूरिक ऍसिडने त्रस्त आहात? मग ‘हा’ घरगुती उपाय करुन पाहा आणि सांधेदुखीपासून लांब राहा


मुंबई 18 सप्टेंबर : बदलत्या जिवनशैलीमुळे लोकांना वेगवेगळ्या आरोग्याशी संबंधीत समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. ज्यामध्ये युरिक ऍसिड ग्रस्त लोकांचा देखील समावेश. या समस्येशी संबंधीत लोकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. युरिक ऍसिड हा एक लिक्वीड आहे, जो शरीरात तेव्हा तयार होतो जेव्हा शरीर प्युरिन नावाच्या रसायनांचे तुकडे करतो. तसेच जेव्हा मूत्रपिंड फिल्टर करण्याची क्षमता कमी करते, तेव्हा शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी वाढते. यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण यावर नियंत्रण ठेवले नाही तर यामुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकतात.

हा आजार जर झाला, तर डॉक्टरांशी संपर्क साधने केव्हा ही चांगले. शिवाय असे काही घरगुती उपाय देखील आहेत. ज्यांचा वापर करुन तुम्ही या समस्येवर नियंत्रण मिळवू शकता.

हे वाचा : पुदिन्यामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म; 7 महत्त्वाचे फायदे येथे जाणून घ्या

युरीक ऍसिड समस्येवर एक रामबाण उपाय समोर आला आहे, तो म्हणजे दुधीचा रस, त्याचे सेवन करणे. बऱ्याच लोकांना ही भाजी म्हणून देखील खायला आवडत नाही, परंतू याचं फायदे जर तुम्ही ऐकलेत, तर तुम्ही स्वत: त्याचं सेवन करु शकता.

दुधी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी, बी आणि आयर्न मुबलक प्रमाणात असते, जे शरीरासाठी खूप चांगले मानले जाते. याच्या सेवनाने यकृत, किडनीसारखे आजार दूर राहतात. यासोबतच यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हे वाचा : वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील खाता का सॅलेड? मग जरा सांभाळून, कधीही करु नका ‘या’ चूका

पण आता प्रश्न उभा असा राहातो की, याचा रस कसा काढायचा? चला याबद्दल जाणून घेऊ या.

सर्व प्रथम दुधीला पाण्याने नीट धुवा.

त्यानंतर दुधी सोलून बारीक कापून घ्या.

आता कुकरमध्ये दुधी थोडे पाणी आणि मीठ टाका.

यानंतर कुकर बंद करा आणि ५-६ शिट्ट्या होऊ द्या.

शिट्ट्या झाल्या की दुधीला थोडासा मॅश करा.

आता एका पातेल्यात एक चमचा देशी तूप टाका.

यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे टाका.

त्यानंतर लगेच उकडलेला दुधी त्यात टाका.

आता चवीनुसार मीठ घालून साधारण २ मिनिटे शिजवा.

जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चवीसाठी त्यात थोडी काळी मिरी देखील घालू शकता.

तयार झाला तुमचा दुधीचा रस, आता याचं सेवन करा आणि युरीक ऍसिडच्या समस्यांपासून लांब राहा.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News