23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

आज जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस, जाणून घ्या काय आहे थीम, उद्देश – News18 लोकमत


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : रुग्णांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या बऱ्या करता येण्याजोग्या आरोग्य समस्या किंवा रोग बरे करणे, हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. मात्र, आजच्या काळात औषधांच्या हेराफेरीमुळे ना रुग्ण सुरक्षित आहे ना डॉक्टरांना आपले कर्तव्य बजावता येत आहे. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी आजारी पडतो आणि अशा वेळी त्याच्यासाठी औषधे खूप महत्त्वाची असतात. विशेषत: कोविडची साथ आल्यानंतर औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि चुका दिसून येत आहेत. अशा धोक्यांची रुग्णांना जाणीव करून देण्यासाठीच जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची थीम ‘मेडिटेशन सेफ्टी’ ठेवण्यात आली आहे. या दिवसाबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊया.

जागतिक रुग्ण सुरक्षा दिवसाचे महत्त्व –

रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित आव्हानांवर लक्ष वेधण्यासाठी डब्ल्यूएचओकडून ही जागतिक मोहीम राबवली जाते.

या मोहिमेत औषध कंपन्यांच्या भागधारकांचे लक्ष औषधांच्या हेराफेरी, गैरप्रकारांकडे वेधले जाते. जेणेकरून या सर्व गैरप्रकारांना आळा बसेल. यामध्ये पॉलीफार्मसी इत्यादीमधील बदल निगडीत आहेत.

जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस 2019 मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला. औषधांशी संबंधित धोक्यांबद्दल जागरुकता पसरवणे हे त्यावेळचे मुख्य उद्दिष्ट होते.

हे वाचा – तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

त्याचा उद्देश भागधारक आणि भागीदारांचे लक्ष वेधणे हा देखील आहे, जेणेकरून ते प्रकरणाचे गांभीर्य समजू शकतील आणि योग्य पावले उचलू शकतील.

याद्वारे रुग्ण आणि कुटुंबीयांनाही सजग करण्याचा उद्देश आहे. जेणेकरून त्यांनाही औषधांच्या सुरक्षित वापराबाबत माहिती मिळेल.

हे वाचा – डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

यंदा ‘मेडिकेशन विदाउट हार्म’ या गोष्टीवर अधिक भर दिला जात आहे. 17 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जात असून त्यासंदर्भात अनेक उपक्रमही केले जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News