12.8 C
New York
Monday, March 4, 2024

ऐकावं ते नवल! खास डासांसाठी चालवली जाते आहे ही स्पेशल Mosquito Terminator Train; पाहा VIDEO


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : रेल्वे, ट्रेन म्हटलं की त्यात प्रवासी आणि मालवाहतूक होते. सणासुदीचा काळ असेल किंवा काही खास कार्यक्रम असेल तर स्पेशल ट्रेन चालवल्या जातात. पण कधी डासांसाठी स्पेशल ट्रेन चालवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? पण देशाच्या राजधानीत अशीच डासांसाठी खास स्पेशल ट्रेन चालवली जाते आहे. मॉस्क्विटो टर्मिनेटर ट्रेनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

डास म्हणजे आजार पसरवण्यास कारक ठरतात. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया असे गंभीर आणि जीवघेणे आजार होतात. त्यामुळे डास आपल्या आसपास असावेत असं कुणालाच वाटत नाही. किंबहुना डासांच्या नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. उपाय केले जातात. असं असताना डासांसाठी स्पेशल ट्रेन का बरं? डासांना नेमकं या ट्रेनमधून कुठे नेलं जाणार? या डासांचं काय केलं जाणार? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील.

हे वाचा – घरच्या घरीच तयार करा Mosquitoes Killer; एकही डास जिवंत राहणार नाही

पण डासांसाठी ट्रेन म्हणजे या ट्रेनमधून डासांची वाहतूक होणार नाही तर ही ट्रेन डासांचा खात्मा करणार आहे. पावसाळा म्हटला की डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका. घरात आपण डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, कॉईल, क्रिम, लिक्विड याचा वापर करतो. प्रशासनामार्फत जागोजागी फवारणी केली जाते. पण दिल्लीत या डासांचा खात्मा करण्यासाठी ही स्पेशल ट्रेन चालवली जाते.

डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी ही ट्रेन चालवली जाते. या ट्रेनला डबे नाहीत. तर त्यावर हायप्रेशर ट्रक आहेत. ज्यातून मॉस्क्विटो औषध स्प्रे होतं. ही ट्रेन ताशी 20 किमी वेगाने धावते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News