23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

केसांपासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर


मुंबई, 16 सप्टेंबर : आपण सर्वजण आपल्या घरात पूजा करताना कापूर वापरतो. कापरामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. कापराच्या या गुणांमुळे  त्याचा उपयोग केवळ पूजेतच नाही तर आरोग्य आणि सौंदर्य उत्पादनांमध्येही केला जातो. कापूर आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे, त्यापेक्षा कापूर तेल जास्त फायदेशीर आहे. त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांवर कापूर तेल खूप फायदेशीर आहे. कापूर आहारात घेतल्यानं अनेक प्रकारचे त्वचारोग दूर होतात. जाणून घेऊया कापूर तेलाचे सर्व फायदे.

– डागांवर फायदेशीर

चेहऱ्यावर डाग पडण्याचा अनेकांचा प्रॉब्लेम असतो. अशा लोकांसाठी कापूर तेल खूप फायदेशीर ठरू शकते. अशा लोकांनी रोज कापूर तेल चेहऱ्यावर लावावे किंवा खोबरेल तेलात कापूर मिसळूनही लावू शकता.

– भेगा पडलेल्या टाचांसाठी फायदेशीर

हवामान बदलल्यावर टाचा फुटण्याचा प्रॉब्लेम अनेकांच्या बाबतीत होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ करून त्यात कापूर तेल लावले तर तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना खूप आराम मिळेल आणि त्यामुळे तुमच्या टाचा मऊ होतील.

हे वाचा – हात भाजल्यावर अनेकजण या चुका करतात; जखम त्यामुळं लवकर बरी नाही होत

– पिंपल्सवर फायदेशीर

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे मुख्य कारण म्हणजे चेहऱ्याचा तेलकटपणा. कापूर तेल तुमच्या पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कापूर तेल चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रे उघडली जातात. त्यामुळे पिंपल्स येणार नाहीत.

हे वाचा – फुफ्फुसांवर थेट परिणाम करतात या 5 गोष्टी; वेळ निघून जाण्यापूर्वी काळजी घ्या

– कोंडा कमी होईल –

अनेक वेळा चुकीच्या शाम्पू किंवा साबणाचा वापर केल्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या उद्भवते. यावर तुम्ही कापूर तेल वापरू शकता. रात्री झोपताना केसांना कापूर तेल लावा आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चांगल्या शाम्पूने केस धुवा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News