3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

भुवयांच्या आकारावरून कळतं समोरची व्यक्ती आहे कशी, असा लावू शकता अंदाज


मुंबई, 17 सप्टेंबर : सामुद्रिकशास्त्रामध्ये मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचे तपशीलवार वर्णन दिलेले आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती डोळे, नाक, कान, तोंड यावरून मिळू शकते. व्यक्तीच्या भुवयांची रचना, रंग इत्यादी गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण सांगू शकतो.

याशिवाय भुवयांवरून एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थितीही जाणून घेऊ शकता. ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

प्रत्येक भुवयांच्या आकाराचा असतो वेगळा अर्थ

– भुवयांमधील अंतर

काही लोकांच्या भुवयांच्या मध्यभागी जास्त अंतर असते आणि त्यांच्या भुवयांचा आकार सपाट असतो. अशा व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या असतात, असे सामुद्रिकशास्त्र सांगते. तसेच हे लोक खूप भावनिक देखील असतात. असे लोक दुसऱ्यांच्या बोलण्यात लवकर येतात आणि आपले नुकसान करतात.

– लहान भुवया

ज्या लोकांच्या भुवया लहान पण दाट दिसतात. ते खूप रागीट स्वभावाचे मानले जातात. सामुद्रिकशास्त्र सांगते की, अशा लोकांमध्ये अजिबात संयम नसतो. त्यामुळे ते आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतात.

-‘v’ आकाराच्या भुवया

ज्या लोकांच्या भुवया V आकारात असतात, ते लोक यशस्वी व्यापारी असतात. असे लोक इतर लोकांवर लवकर आणि सहज विश्वास ठेवत नाहीत, असे सामुद्रिकशास्त्र सांगते.

हे वाचा –  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

– वक्र (वाकड्या-तिकड्या) भुवया

समुद्रिकशास्त्रानुसार ज्या लोकांच्या भुवया वाकड्या-तिकड्या असतात, ते लोक अनेकदा समजून घेऊनही चुकीचे निर्णय घेतात. अशा लोकांना माहीत असते की ते जे काम करणार आहेत, ते चुकीचे आहे पण तरीही ते काम करत राहतात.

हे वाचा – येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News