27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

मदतच नव्हे तर रक्तदान आपल्या आरोग्यासाठीही उत्तम, जाणून घ्या 5 मोठे फायदे – News18 लोकमत


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : आजही रक्तदानाबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो आणि नंतर अनेक रोग होऊ शकतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. रक्तदान ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. एका अहवालानुसार, रुग्णालयात जाणाऱ्या सातपैकी एका व्यक्तीला रक्ताची गरज असते, काही वेळा रक्ताअभावी लोकांचा मृत्यू होतो.

केवळ भारतातच नाही तर अमेरिकेसारख्या विकसित देशातही रक्तदानाची मोठी समस्या आहे. हेल्थ मॅटर्स आणि अमेरिकन रेड क्रॉसच्या माहितीनुसार, अमेरिकेत दर दोन सेकंदाला एखाद्याला रक्ताची गरज असते. जानेवारी 2022 मध्ये, अमेरिकन रेड क्रॉसने घोषित केले की ओमिक्रॉनच्या काळात एका दशकातील सर्वात वाईट रक्ताचा काळ होता.

फायनान्शिअल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, आपल्या देशातील केवळ 37 टक्के लोक रक्तदान करण्यास पात्र आहेत, परंतु त्यापैकी 10 टक्क्यांहूनही कमी लोक दरवर्षी रक्तदान करतात. रक्त ही निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. याद्वारे आपण लोकांना अनेक प्रकारे मदत करू शकतो. खूप कमी लोकांना माहित आहे की, रक्तदान केल्याने आपल्या शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु त्याचा आपल्याला अनेक प्रकारे फायदाच होतो. आपण रक्तदान केल्यास आपल्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

वजन कमी करण्यास मदत होते-

तुमचे वजन खूप वाढले असेल तर रक्तदान केल्याने ते कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, वजन कमी करण्याच्या मुख्य नियमांत ते येत नाही. यासोबतच रक्तदान केल्याने कामांमधील स्टॅमिनाही वाढतो. कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा धोका टाळण्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे.

प्रतिकारशक्ती वाढते –

एकूण शारीरिक आरोग्यासाठीही रक्तदान फायदेशीर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डायलिसिस किंवा रक्तदान करते, तेव्हा प्लीहा, लाल रक्तपेशींसाठी जबाबदार असलेला अवयव, संपूर्ण नवीन उर्जेने कार्य करण्यास सुरुवात करतो. रक्ताच्या प्लाझ्मामध्ये ल्युकोसाइट्सची वाढ देखील होते, जे आपल्या रोगप्रतिकारक पेशी आहेत जे आपल्याला अनेक गंभीर रोगांपासून संरक्षण करतात.

हे वाचा – डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

हृदयविकाराचा धोका कमी होतो –

जर तुम्ही नियमित रक्तदान केले तर शरीरातील लोहाची पातळी नियंत्रणात राहते. रक्तातील लोहाचे उच्च प्रमाण रक्तवाहिन्यांना अवरोधित करू शकते, ज्यामुळे रक्त परिसंचरण खराब होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आणि हिमोक्रोमॅटोसिस (लोह ओव्हरलोड) नावाचा रोग होतो. रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

हे वाचा – तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

कर्करोगाची शक्यता कमी होते –

रक्तात लोह साचू नये, यासाठी रक्तदान हा अतिशय योग्य मार्ग आहे. रक्तामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर –

रक्तदानाचे अनेक आरोग्य फायदे आहेत, पण सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक फायदा. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुमच्या मनात एक सुखद भावना असते की, एखाद्याला आपल्यामुळे मदत होईस. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते आणि तुम्हाला आनंद वाटतो. रक्तदानाचा अर्थ असा आहे की, एखाद्याला कुठेतरी अत्यंत गरजेच्या वेळी मदत मिळेल आणि आपण आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचवू शकाल. या मदतीमुळे मिळणारा आनंद तुमचे मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारतो. मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत बनता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News