3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

वॉशिंग मशीनमधून कपडे धुतल्यावरही वास येतोय का? या 5 टिप्स फॉलो करा


मुंबई, 17 सप्टेंबर : कामे जलद होण्यासाठी आजकाल बहुतेक लोक वॉशिंग मशिनचा वापर करतात. वॉशिंग मशिनने कपडे धुतल्याने श्रम आणि वेळ दोन्हीची बचत होते. मात्र, अनेक वेळा चांगला डिटर्जंट आणि चांगल्या कंपनीचे वॉशिंग मशिन वापरल्यानंतरही कपड्यांमध्ये एकप्रकारचा वास येत राहतो. विशेषत: पावसाळ्यात येणारी ही दुर्गंधी आपली सारी मेहनत वाया घालवते. कपड्यांना वास येण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की ओलसरपणा, डिटर्जंटचा वास किंवा कपडे नीट साफ न करणे.

अशा परिस्थितीत पुन्हा कपडे धुण्याशिवाय पर्याय उरत नाही. यावर जाणून घेऊया अशा काही घरगुती टिप्स ज्यांच्या मदतीने आपण कपड्यांमधून येणार्‍या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता.

कपडे पूर्णपणे कोरडे करा –

कपड्यांमधून येणारा विशिष्ट वास अनेकांना त्रास देऊ शकतो. SpeedQueen.com मध्ये दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतल्यानंतरही वास येत असेल तर ते पुन्हा धुण्याऐवजी ते कडक उन्हात पूर्णपणे वाळवले पाहिजेत. कडक उन्हात कपडे वाळवल्याने वास बर्‍याच प्रमाणात दूर होतो.

हे वाचा – डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत कापूर तेलाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

व्हिनेगर वापरा –

काही वेळा धुतलेल्या कपड्यांनाही बुरशीमुळे दुर्गंधी येते. बुरशी घालवण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. कपडे धुताना वॉशिंग मशिनमधील डिटर्जंटमध्ये थोडेसे व्हिनेगर घातल्याने कपडे चांगले स्वच्छ होण्यास मदत होते तसेच बॅक्टेरिया नष्ट होतात.

हे वाचा – तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

डिटर्जंट बदला –

अनेक वेळा त्याच-त्याच डिटर्जंटने कपडे धुतल्याने त्यांचा वास कपड्यांमध्ये राहतो. कपड्यांमधून येणारा वास घालवण्यासाठी डिटर्जंट बदलणे हाही एक पर्याय आहे. बाजारात अनेक प्रकारचे वॉशिंग मशीन फ्रेंडली डिटर्जंट उपलब्ध आहेत, ते वापरू शकता. मशिनमध्ये ग्रॅन्युलर डिटर्जंटऐवजी लिक्विड डिटर्जंट वापरता येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News