27.6 C
New York
Monday, July 15, 2024
spot_img

What foods should be consumed in the diet to keep the bone of the spine rp


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : खराब जीवनशैलीमुळे मणका कमकुवत होणं, मणक्यामध्ये वेदना होणं हा एक कॉमन प्रकार बनला आहे. यासाठी देखील आपल्याला खाण्या-पिण्यात विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या आहारात अशा गोष्टी खाण्याचा प्रयत्न करायला हवा, ज्यामुळे आपला मणका मजबूत होतो. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी खाव्यात ज्यामुळे पाठीचा कणा मजबूत (spine care tips) होईल.

हिरव्या पालेभाज्या

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, हिरव्या पालेभाज्या या अनेक आजारांचे औषध आहे, असे मानले जाते. आपल्या शरीराचा पाठीचा कणा मजबूत करण्यातही हिरव्या पालेभाज्या महत्त्वाची भूमिका बजावतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही पालक रोज खाऊ शकता. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी त्या महत्त्वाच्या असतात.

नारंगी रंगाच्या भाज्या, फळे खा –

याशिवाय नारंगी रंगाच्या भाज्याही आपण खाऊ शकता. या रंगातील भाज्या खाल्ल्याने पाठीचा कणा मजबूत होतो. यामध्ये तुम्ही सीताफळ, रताळी आणि गाजरही खाऊ शकता.

आहारात ड्रायफ्रुट्स हवेत –

यासोबतच पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी बदाम आणि अक्रोड सारखे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. बदाम हा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-ईचा चांगला स्रोत आहे. अक्रोडात इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा ओमेगा-3 जास्त असल्याचे मानले जाते. यासोबतच हे खाल्ल्याने शरीरात सूज येत नाही.

मणका मजबूत करण्यासाठी तीन उपाय

वॉक करा

टीव्ही पाहताना मध्ये-मध्ये थोड्या वेगात चालण्याचा सल्ला डॉ. अग्रवाल यांनी दिला आहे. त्यामुळे स्नायूंची ताठरता कमी होते आणि लवचिकता वाढते.

हे वाचा – ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

चाईल्ड पोज योगासन

मणक्याच्या दुखण्यावर चाईल्ड पोज योगासन फायदेशीर ठरतं. पायाच्या बोटांवर बसून हाताचे तळवे लहानमुलाप्रमाणं जमिनीवर ठेवा. त्यानंतर हळूहळू श्वास घेत एक ते दोन मिनिटं त्याच स्थितीत रहा. पुन्हा श्वास घेत आधीच्या स्थितीत या. याचंप्रमाणं काऊ आणि कॅट पोझ योगासनं देखील फायदेशीर ठरतात. या योगासनांमुळं शरीर आणि मणक्यातील रक्त प्रवाह सुधारतो, मांड्या, हिप्स आणि घोट्यांना बळकटी येते. मणक्याचे स्नायू देखील मजबूत होतात.

हे वाचा – डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

ब्रिज एक्सरसाइज

ब्रिज एक्सरसाइज करण्यासाठी जमिनीवर झोपा, पायाच्या तळव्यांवर जोर देऊन आपला पार्श्वभाग उचलून एका रेषेत आणा. 10 ते 15 सेकंद त्याच स्थितीत रहा. ही कृती 15 मिनिटांसाठी तीनदा करा. प्रत्येक सेट दरम्यान एक मिनिटाचं अंतर ठेवा. यामुळे हिप्सचे स्नायू मजबूत होतात. आपले हिप्स पाठीच्या खालच्या भागाला आधार देतात आणि पाठीचा कणा मजबूत करतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News