22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

ओझोन थर घटण्याचा आरोग्याशी थेट संबंध, या गंभीर आजारांमध्ये होतेय वाढत – News18 लोकमत


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : आजकाल वाहने आणि उद्योग-धंद्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात, विशेषत: मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण इतके वाढले आहे की लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाबाबत आगामी काळात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर प्रदूषणाचे परिणाम आणखी धोकादायक बनू शकतात. वातावरणातील ओझोनचा थर सतत खराब होत आहे. ओझोनचा थर आपल्या पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. या थराला होणाऱ्या नुकसानीमुळे लोकांच्या जीवाला धोका सातत्याने वाढत आहे. ‘जागतिक ओझोन दिना’च्या निमित्ताने (World Ozone Day 2022) ओझोन प्रदूषण म्हणजे काय आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.

ओझोन थर म्हणजे काय?

ओझोन हा वायू वातावरणात असतो, ज्याचा रंग हलका निळा असतो. ओझोनचा थर पृथ्वीपासून 50 किमी अंतरावर स्ट्रॅटोस्फियरमध्ये आढळतो. ओझोन थराला ओझोन ढाल देखील म्हणतात, कारण ओझोन सूर्यापासून हानिकारक अतिनील किरणे शोषून घेते आणि अतिनील किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून संरक्षण करते. या किरणांमुळे कर्करोगासारखे अनेक घातक आजार होऊ शकतात.

ओझोन प्रदूषण म्हणजे काय?

ओझोनच्या थराला नुकसान करणाऱ्या प्रदूषणाला ओझोन प्रदूषण म्हणतात. ओझोन प्रदूषण ही आजची एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे बहुतेक श्वसन समस्यांचा धोका वाढतो. जंगलतोड, पाणी प्रदूषण याचे मुख्य कारण असून रेफ्रिजरेटर आणि एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापरही ओझोनसाठी घातक आहे.

ओझोन प्रदूषण आणि आरोग्य यांच्यातील संबंध –

सीडीसीच्या मते, ओझोन थर आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजार होऊ शकतात. ओझोनचा थर या किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो आणि रोगांपासून आपले संरक्षण करतो. प्रदूषणामुळे ओझोनचा थर तुटत आहे. ओझोन प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचा त्रास, दमा, खोकला आणि वेदना, फुफ्फुस कमजोर होणे, जळजळ, शरीरात अशक्तपणा, शारीरिक हालचाली करण्यात अडचण, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखणे असे प्रकार वाढत आहेत.

हे वाचा – कॅन्सर, डायबेटिज रुग्णांना मोठा दिलासा; ही औषधं स्वस्त, इथं पाहा यादी

ओझोन प्रदूषणाचा सर्वाधिक धोका कोणाला आहे?

ओझोन प्रदूषण प्रत्येकाला प्रभावित करते, परंतु त्याचा सर्वात जास्त परिणाम दमा आणि फुफ्फुसाच्या आजाराच्या रुग्णांवर होतो. याशिवाय वृद्ध, लहान मुले आणि घराबाहेर जास्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो.

हे वाचा – प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाचा घेरही होईल कमी

आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे –

शक्य असल्यास घराबाहेर जास्त वेळ न घालवता, घरीच वेळ घालवा.

घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची सवय लावा.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News