12.8 C
New York
Monday, March 4, 2024

कामावर नेहमी बॉसचा ओरडा खातात या राशीचे लोक, असा करा उपाय


मुंबई, 16 सप्टेंबर : ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या आजारपणापासून ते त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. लोकांच्या ऑफिस एरियाबद्दल बोलायचे तर 12 राशींपैकी तीन राशी अशा आहेत की, त्यांना अनेकदा त्यांच्या बॉसच्या रोषाला, टोमण्यांना सामोरं जावं लागतं. कधी-कधी चुकीचं काम दुसरंच कोणीतरी करतं आणि बळी या राशीचे लोक जातात.

अशा तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत, ज्यांना अनेकदा त्यांच्या बॉसच्या रोषाला बळी पडावे लागते, याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा अधिक माहिती देत आहेत.

कोणत्या राशीच्या लोकांना जास्त बोलणं खावं लागतं –

ज्योतिष शास्त्रानुसार, अशा 3 राशी आहेत ज्यांना बॉसकडून सर्वाधिक फटकारले जाते. पहिली कन्या, दुसरी मकर आणि तिसरी मीन. या 3 राशीच्या लोकांना अनेकदा बॉसची नाराजी सहन करावी लागते. कन्या राशी लोकांवर बॉस रागावला तर वैयक्तिक वाद सुरू होतात. तर, मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या बॉसला अधिक आदर दिला पाहिजे. मीन राशीच्या लोकांनी गुरु म्हणून त्यांच्या बॉसकडून काही ना काही शिकत राहावे.

हे वाचा – कॅन्सर, डायबेटिज रुग्णांना मोठा दिलासा; ही औषधं स्वस्त, इथं पाहा यादी

ज्योतिष शास्त्रानुसार या तिन्ही राशीच्या लोकांनी आपल्या बॉसची निंदा टाळण्यासाठी किंवा बॉसची नाराजी टाळण्यासाठी सूर्यदेवाची उपासना करावी, कारण बॉस सूर्यासारखा मानला जातो.

हे वाचा – प्रसूतीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, पोटाचा घेरही होईल कमी

उपाय –

जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बॉसच्या नाराजीला सतत बळी पडत असाल तर रविवारी सूर्यदेवाला प्रसन्न करणे तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे शुभ मानले जाते. अर्घ्य देताना पाण्यात लाल फुले, अक्षता, रोळी आणि साखरेची मिठाई टाकावी. याशिवाय गायत्री मंत्राचा नियमित जप करणे देखील फायदेशीर आहे. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी उच्च पदावर विराजमान झालेल्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News