12.8 C
New York
Monday, March 4, 2024

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच त्वचेसाठी सुपर ड्रिंक आहे ताक; महत्त्वाचे 5 फायदे – News18 लोकमत


नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : ताक हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत काम करते. पारंपरिक पद्धतीने दही घुसळून ताक बनवले जाते. याशिवाय काहीजण दह्यात पाणी घालून ते पातळ करूनही बनवतात. इंग्रजीत त्याला बटर मिल्क म्हणतात, पण बहुतेक लोक त्याला ताक म्हणतात. बाजारात मिळणारे ताक फर्मंटेशनद्वारे तयार केले जाते. यामुळे त्यातील चरबी निघून जाते आणि ते पारंपारिक ताकापेक्षा ते अधिक चिकट असते.

ताकामधील पोषक घटक –

Pharmacy.in मधील डॉ. प्राची गर्ग सांगतात की, 100 मिली ताकातून फक्त 40 कॅलरी ऊर्जा पोटात जाते. म्हणजेच त्यात खूप कमी कॅलरीज असतात. त्यातून लोणी काढले जात असल्याने चरबीही शून्य होते. पण त्यात प्रथिने आणि कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते. याशिवाय सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात.

ताकाचे 5 फायदे –

ताक हे आपल्या पचनसंस्थेसाठी वरदान आहे. ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ऍसिड असते जे पचन आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात. यामुळे नियमित मलविसर्जन होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) वर उपचार करण्यासाठी ताक देखील उपयुक्त आहे. तसेच पोटाचे संक्रमण आणि कोलन कॅन्सरपासून बचाव करण्यात मदत होते.

हे वाचा – डोळ्यांच्या तक्रारी दूर ठेवण्यासाठी आहारातून शरीरात जायला हवीत ‘ही’ व्हिटॅमिन्स!

ताक हाडे आणि दातांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. 100 मिली ताकामध्ये सुमारे 116 मिलीग्राम कॅल्शियम असते. निरोगी हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. त्यामुळे आपली हाडे तसेच दात मजबूत होतात. कॅल्शियम ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या झीज होण्यापासून बचाव करण्यास मदत करते. रक्त गोठणे, स्नायू आकुंचन पावणे आणि आपल्या हृदयाचे ठोके यासाठी देखील कॅल्शियम आवश्यक आहे.

ताकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. ताक नियमितपणे प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांना सूज येण्यास त्यामुळे प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

हे वाचा – वंध्यत्व असलेल्या पुरुषांसाठी वरदान ठरेल ‘हे’ तंत्रज्ञान

ताकामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आपल्या त्वचेसाठी चांगले असते. ताक आपली त्वचा चमकदार ठेवते आणि त्वचा स्वच्छ करणारे ते टोनर म्हणून वापरू शकता. हे टॅन, पिंपल्स आणि डाग काढून टाकण्यास देखील मदत करते. ताक आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचा उजळवते, ज्याचा वृद्धत्व विरोधी प्रभाव असतो. हे सर्व फायदे आपल्या त्वचेसाठी वरदान ठरतात.

वजन कमी करण्यासाठी ताक उपयुक्त आहे. ताकामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. परंतु, कॅलरी आणि चरबी कमी असतात. ताक प्यायल्याने आपण हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहतो. त्यामुळे आपले पोट भरलेले वाटते, त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे एक परिपूर्ण पेय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News