23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

मनसोक्त खाऊन घटवा वजन; फक्त आहारात सामील करा हे पदार्थ – News18 लोकमत


मुंबई, 15 सप्टेंबर : आजच्या युगात मोठ्या संख्येने लोक आपले वजन कमी करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. वजन कमी करण्यासाठी चांगला आहार योजना असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आहाराकडे लक्ष दिले आणि व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्या तर नक्कीच वजन कमी करणे सोपे होईल. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ तुमची मदत करू शकतात.

मखाना

नवभारत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, मखाना वजन कमी करण्यासाठी आणि पोषणाचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात मखनाचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Green Tea Side Effect : ‘या’ वेळेला चुकूनही पिऊ नका ग्रीन टी; फायद्यांऐवजी नुकसानच होईल जास्त

स्प्राऊट्स

अंकुरलेल्या धान्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि इतर स्नॅक्सच्या तुलनेत कमी कॅलरी असतात. याला स्प्राउट्स हे खाल्याने शरीराला ताकद मिळते आणि शरीरात फॅट्स वाढत नाही. याशिवाय वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही हे फायदेशीर आहे.

लिंबूवर्गीय फळं

उन्हाळ्यात आपल्या आहारात पाणीयुक्त पदार्थांचा समावेश असला पाहिजे. विशेषत: ज्यामध्ये जीवनसत्त्व आणि फायबर असतात आणि ते पोटासाठीदेखील निरोगी असतात. अशा परिस्थितीत तुम्ही उन्हाळ्यात स्नॅक म्हणून फळांपासून फ्रूट सॅलड तयार करू शकता. यामध्ये तुम्ही संत्रा, केळी, टरबूज, संत्री, जामुन आणि पपई या फळांचा समावेश करू शकता.

प्रोटीन रिच फूड

वजन कमी करण्यासाठी प्रोटीनची महत्वाचे असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी पुरेसे प्रोटीन घेतले पाहिजे कारण ते निरोगी चयापचय राखण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करते.

चिया सीड्स

चिया सिड्समध्ये प्रोटीन आणि फायबर असतात. परंतु ते वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी स्नॅकदेखील असतात. या बिया पोटात फुगतात आणि यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.

Green Apple चे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? वजन कमी करण्यापासून ते वृद्धत्व थांबवण्यासाठी देखील फायदेशीर

ओटमील

ओटमील बीटा-ग्लुकन्सचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे एक विरघळणारे फायबर जे आरोग्यास प्रोत्साहन देते. ओटमील आहारात फायबर आणि प्रोटीनचा भरपूर पुरवठा करते.

सुका मेवा

सुका मेवा हा स्नॅकिंगचा उत्तम पर्याय आहे कारण त्यात फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स योग्य प्रमाणात असतात. त्यामध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट असूनही वजन कमी करण्यास मदत करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News