12.8 C
New York
Monday, March 4, 2024

मानसिक ताण आणि प्रचंड कलहाचा आजचा दिवस; या राशीने राग आवरा; अन्यथा… – News18 लोकमत


आज दिनांक १५ सप्टेंबर २०२२. आज गुरुवार. भाद्रपद कृष्ण पंचमी .षष्ठी श्राद्ध. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीतून असेल. राहू चंद्र युती नुसार पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

मंगळ मानसिक ताण आणि कुटुंबात क्लेश निर्माण करेल. भाग्येश गुरू व्यय स्थानात आहे, धार्मिक ,कौटुंबिक कारणांसाठी खर्च होईल. भ्रम निर्माण करणारा दिवस आहे. दिवस मध्यम आहे .

वृषभ

राशीतील मंगळ कडक रूप धारण करील. राग आवरा. भावंड भेट होईल पण कलह टाळा. आर्थिक व्यय होईल. प्रवासाचे योग आहे. दिवस मध्यम जाईल.

मिथुन

राशीच्या लाभ स्थानात चंद्र आणि राहू आर्थिक परिस्थितीत बदल घडवुन आणेल..मित्र मंडळी भेटतील. प्रकृती ठीक राहील. शुक्र भ्रमण गृहसौख्य देईल . दिवस बरा आहे.

कर्क

दशम स्थानात प्रवेश करणार चंद्र काही काळ नोकरी व्यवसायात काळजी घेण्याचा इशारा देत आहे . प्रवास टाळा. द्वितीय शुक्र आकर्षक व्यक्तिमत्व देईल. दिवस शुभ.

सिंह

षष्ठ स्थानात शनि प्रकृती ची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून घरात काही धार्मिक पूजा इत्यादी कराल.दिवस शुभ.

कन्या

अष्टम स्थानातील चंद्र शत्रू पासून कष्ट देइल. मात्र तुमचाच विजय होईल. मंगल भ्रमण प्रवास घडवून आणेल.घरात ही वेळ द्या..अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तुला

जोडीदार संबंधी चिंता, अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. पोटाची काळजी घ्या. चंद्र भ्रमण कुटुंबा सोबत वेळ घालवा असे सुचवीत आहे.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात आणि चंद्र राहू शष्ठ स्थानात येत असून पारिवारिक किंवा आर्थिक क्षेत्रात जपण्याचे संकेत देत आहे. संतती सोबत काही वेळ घालवा .दिवस उत्तम.

धनु

आज पंचम चंद्र संतती बाबत काही तणाव निर्माण करणार असून प्रकृती कडे लक्ष देणे गरजेचे आहे . रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्या. ग्रहण योगाच्या पार्श्व भूमीवर काही जप व दान करा.दिवस मध्यम.

मकर

राशीत शनि आणि पंचमात मंगळ हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. मातृ चिंता संभवते. उत्तम दिवस .

कुंभ

शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे .प्रवास योग येतील. काळजी घ्या. चतुर्थ मंगळ आणि तृतीय चंद्र घरामध्ये काही त्रास होण्याची शक्यता. दिवस मध्यम.

मीन

लाभ स्थानातील शनि आणि द्वितीय राहू आर्थिक बाबीत जपून राहण्याचा संकेत देत आहे . कार्यक्षेत्रात लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू शुभ फल देईल. दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News