23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

वैवाहिक जीवनात तणाव; या राशीने तर आज जोडीदाराशी मतभेद टाळाच – News18 लोकमत


आज दिनांक 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार. आज भाद्रपद कृष्ण षष्ठी. सप्तमी श्राद्ध. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. चंद्र मंगळ योग निर्माण होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस गृह सौख्य देणारा आहे. मन उत्साही राहिल. ईश्वरी उपासना बळ व यश देईल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. जोडीदाराशी मतभेद टाळा. दिवस उत्तम.

वृषभ

आज चंद्र राशी स्थानातून भ्रमण करीत आहे. मन थोडे नाराज होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळ खर्च वाढेल असं सुचवत आहे. दान उपासना करा. गृहकलह टाळा. दिवस बरा आहे.

मिथुन

आज दिवस अनेक ठिकाणी संपर्क भेटी देण्याचा आहे. मानसिक ताण येईल. शांत दिवस घालवा. खर्चाचे नवीन मार्ग तयार होतील. आर्थिक गुंतवणूक करा. दिवस मध्यम.

कर्क

आज भक्तिमय वातावरणात दिवस संपन्न होईल. वाचन मनन कराल. गृहसौख्य मिळेल. आर्थिक बाबी जपून करा. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम .

सिंह

आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. घरात आलेली जबाबदारी पार पाडाल. वैवाहिक जीवन तणावाचे राहिल. जप, दान करा. दिवस आनंदात पार पडेल.

कन्या

तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. मंगळ वडीलधाऱ्या व्यक्तीशी मतभेद दर्शवत आहे. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. आर्थिक भरभराट होईल. दिवस शुभ आहे.

तूळ

आज चंद्र अष्टम स्थानात आहे. आर्थिक नुकसान होईल. घरात चिंतेचे वातावरण राहिल. जास्तीचे काम येईल. संततीकडे लक्ष द्या. अष्टम मंगळ प्रवासाचे योग आणेल. दिवस शुभ आहे.

वृश्चिक

आज सप्तम स्थानात चंद्र सुखद अनुभव देईल. धार्मिक कार्यात मन गुंतून राहिल. लाभ होतील. वैवाहिक जीवनात ताण राहिल. कलह टाळा. दिवस चांगला आहे.

धनु

आज चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा. राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र मंगळ आहे. भावंडाना लाभ होतील. शत्रुपिडा होईल. दिवस उपासनेत घालवा.

मकर

शनी प्रवास योग आणेल. पण जपून असा. तृतीय गुरू शुभ घटना घडवेल. आईवडिलांची, भावंडांची भेट होईल. वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस चांगला जाईल.

कुंभ

आज दिवस व्यवसाय क्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. नातेवाईक भेट होईल. दिवस उत्तम.

मीन

आज समाजकार्य करण्याचा दिवस आहे. सगळीकडून प्रशंसा, जवळचे प्रवास यात दिवस निघून जाईल. भावंडाना त्रासाचा दिवस. काही प्रश्न सोडवावे लागतील. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News