22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

Shocking! शाळेत जायला निघालेल्या मुलीच्या पायांमध्ये लटकत होतं डोकं; आईसमोर आलं धक्कादायक सत्य


लंडन, 15 सप्टेंबर : सकाळी तिची शाळेत जायची लगबग सुरू होती. शाळेसाठी ती तयार झाली. स्कूल ड्रेस घातला आणि ती लिव्हिंग रूममध्ये आली. तेव्हा तिच्या आईला तिच्या दोन पायांच्या मध्ये काहीतरी लटकताना दिसलं. तिने नीट पाहिलं तर तिला तिच्या पायांमध्ये डोकं लटकताना दिसलं. जे पाहून आईसह मुलीलाही धक्का बसला. त्यानंतर अचानक धक्कादायक सत्य त्यांच्यासमोर आलं.

ही घटना आहे लंडनमधील. एलेक्सिस नावाच्या महिलेने आपला हा विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. टिकटॉकवर तिने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. एलेक्सिस आता 20 वर्षांची आहे. 5 वर्षांपूर्वी जेव्हा ती 15 वर्षांची होती आणि शाळेत जात होती, तेव्हा तिच्यासोबत असं काही घडलं ज्यानंतर तिचं आयुष्यच बदललं.

एलेक्सिने सांगितल्यानुसार एक दिवस शाळेतून आल्यानंतर पूर्ण रात्रभर तिची पाठ दुखत होती. तिच्या पाठीत इतक्या तीव्र वेदना होत होत्या की तिला नीट झोपही लागली नाही. वेदना कमी व्हायव्यात म्हणून तिने औषधही घेतलं. पण सकाळी उठल्यानंतर जे घडलं त्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता.

हे वाचा – लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीसोबत झोपते तिची आई! जाणून घ्या अजब प्रथेचं कारण

दुसऱ्या दिवशी ती शाळेत जाण्यासाठी तयार झाली. स्कूल ड्रेसच्या स्कर्टखाली तिच्या आईला बाळाचं डोकं दिसलं, तिच्या आईसह तिलाही धक्का बसला. लिव्हिंग रूमच्या जमिनीवरच तिने बाळाला जन्म दिला.

एलिक्स म्हणाली, तिच्यात प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं नव्हती. तिला नियमित मासिक पाळीही येत होती. तिच्या आईला संशयही आला होता. पण जेव्हा तिची प्रेग्नन्सी टेस्ट केली तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. ब्रिटिश वेबसाईट द सनच्या रिपोर्टनुसार 6 सप्टेंबर 2017 साली तिने बाळाला जन्म दिला. पाच वर्षांनंतर तिने आपल्या प्रेग्नन्सीचा विचित्र अनुभव सांगितला आहे.

क्रिप्टिक प्रेग्नन्सी

प्रेग्नन्सीच्या लक्षणांशिवाय बाळ जन्माला येण्याचं हे पहिलं प्रकरण नाही याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी (cryptic pregnancy) किंवा प्रेग्नन्सी डिनाइल (pregnancy denial)  म्हणतात.

हे वाचा – ”आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?” हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल

तरुण महिला ज्या कधी प्रेग्नंट झाल्या नाहीत किंवा अशा महिला ज्यांना आपली रजोनिवृत्ती जवळ आली असं वाटतं किंवा ज्या गर्भनिरोधक वापरत नाही अशा महिलांमध्ये अशी प्रेग्नन्सी दिसून येते. पण एखाद दिवशी गोळी घणं राहिलं किंवा डायरिया असेल तर अशी प्रेग्न्सी होऊ शकते. अनियंत्रित मासिक पाळी असलेल्या महिलांनादेखील त्या प्रेग्नंट आहेत, अशी लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि ज्यांच्यामध्ये हार्मोन्स अनियंत्रित आहेत. अशा महिलांमध्येसुद्धा अशी प्रेग्नन्सी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News