22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

अंगारकी संकष्टी चतुर्थीदिनी बाप्पा कुणाला काय फळ देणार; पाहा आजचं राशिभविष्य – News18 लोकमत


आज दिनांक 13 सप्टेंबर 2022 मंगळवार. आज भाद्रपद कृष्ण तृतीय/चतुर्थी. आज अंगारकी चतुर्थी आहे. चतुर्थी श्राद्ध असून चंद्र रेवती नक्षत्रात भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

चंद्र मित्रमैत्रिणी आणि प्रवासबाबतीत आज शुभ फळ देईल. राशीतील राहू मानसिक क्लेश देईल त्यादृष्टीने सावध असावे. द्वितीय मंगळ आर्थिकदृष्ट्या जपून रहा असे संकेत देत आहे. कुटुंबासोबत आनंदात दिवस व्यतीत होईल. दिवस मध्यम.

वृषभ

आज राशीच्या लाभ स्थानातील चंद्र गुरू कार्यक्षेत्रात काही विशेष लाभ मिळवून देईल. आनंद मिळेल. आईवडील भेटतील. चतुर्थ शुक्र घरात उत्तम खरेदीचे योग आणेल. उत्तम दिवस.

मिथुन

चंद्र भ्रमण भाग्य योग करत आहे. उच्च प्रतीचे कौटुंबिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू उत्तम. व्यय मंगळ खर्च वाढवेल. दिवस उत्तम जाईल.

कर्क

भाग्य स्थानातील चंद्र आणि धन शुक्र काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन अस्थिर होईल. मित्रमंडळ भेटेल. लाभाचे योग येतील. मात्र खर्च ही होईल. दिवस शुभ.

सिंह

आज अष्टम चंद्र वैवाहिक सुख, प्रकृतीबाबत कष्ट देईल. मन अस्थिर राहिल. आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. संतती आनंदी राहिल. दिवस मध्यम.

कन्या

आज चंद्र सप्तम स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही व्यग्र राहाल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू विवाह जमण्याकरता मदत करेल. दिवस मध्यम.

तूळ

आज चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. संततीचे मन सांभाळा. प्रकृती जपा. दिवस शुभ.

वृश्चिक

आज मानसिक ताणात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी मध्यम फळ देईल. निरुत्साह वाटेल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार मदत करेल. दिवस मध्यम.

धनु

आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.

मकर

शनी मकर राशीमध्ये वक्री असून ताणतणाव निर्माण करील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. उत्तम दिवस.

कुंभ

द्वितीय चंद्र योग आज दिवस आनंदात घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. सामाजिक प्रतिष्ठा. आर्थिक लाभ. दिवस शुभ.

मीन

आज चंद्र मानसिक ताण घडवेल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. खर्च संभवतात. भावंडाना त्रास. दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News