3.5 C
New York
Wednesday, February 21, 2024

काय आहे कोलेस्टेरॉल हेअर ट्रीटमेंट? निरोगी आणि चमकदार केस मिळवण्यासाठी घरीच असे घ्या उपचार


मुंबई, 14 सप्टेंबर : जर तुमचे केस खूप चमकदार, मऊ, दाट आणि लांब असतील तर तुम्ही भाग्यवान आहात. असे केस कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालू शकतात. आजकाल केसांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वयाच्या आधी दिसू लागतात. केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस कोरडे, निर्जीव आणि खराब होतात. केसांशी संबंधित या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या वापराने केसांना पूर्ण फायदा होत नाही. या सर्व प्रकारच्या समस्या टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोलेस्टेरॉल हेअर ट्रिटमेंट. तुम्ही कधी याबद्दल ऐकले आहे का? नसेल तर जाणून घ्या.

कोलेस्टेरॉल गरम तेल ट्रीटमेंट

स्टाइलक्राझच्या मते केसांना नैसर्गिक ओलावा देण्यासाठी गरम तेलाचा वापर कोलेस्टेरॉल ट्रीटमेंटमध्ये करता येतो. यामुळे केसांची चमक परत येऊ लागते आणि ते पूर्वीपेक्षा चांगले दिसू लागतात. केसांना जास्त गरम करणारी साधने वापरत असल्यास शॅम्पू केल्यानंतर कोलेस्टेरॉल हॉट ऑइल ट्रिटमेंट करा. थोड्या वेळाने धुवा आणि कंडिशनर करा.

Prevent Hair Fall : केसगळतीचे मुख्य कारण असते चुकीचे पदार्थ खाणे, आजच आहारातून काढा हे पदार्थ

घरगुती कोलेस्टेरॉल हेअर ट्रीटमेंट

कोलेस्टेरॉल हेअर ट्रीटमेंट अनादी काळापासून वापरली जात आहे. घरच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या मेयोनीजचा वापर घरगुती कोलेस्टेरॉल केसांच्या उपचारांसाठी केला जाऊ शकतो. यामुळे केस खूप चमकदार आणि रेशमी बनतात. त्याचा वास दूर करण्यासाठी केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा.

Walk केल्यानंतर ही योगासनं करा, पोट अन् श्वासासंबंधित आजारांपासून मिळेल सुटका

डीप कंडिशनिंग कोलेस्टेरॉल ट्रीटमेंट

डीप कंडिशनिंगमध्ये कोलेस्टेरॉलचा सर्वाधिक वापर केला जातो. हे करण्यासाठी कंडिशनर किमान 20 मिनिटे केसांमध्ये सोडा आणि झाकून ठेवा. नंतर गरम टॉवेलच्या साहाय्याने केसांना वाफ द्या. ऑलिव्ह ऑइलदेखील या उपचारात उपयुक्त आहे,. जे आश्चर्यकारक परिणाम देऊ शकते. तुमचे केस चमकदार, जाड आणि सुंदर बनवण्यासाठी हे कोलेस्ट्रॉल उपाय तुम्हाला खूप मदत करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today News

Popular News