22.1 C
New York
Thursday, June 20, 2024
spot_img

गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवावा का नाही? बाळ झाल्यानंतर किती दिवसांनी ठेवावेत संबंध? वाचा


मुंबई 13 सप्टेंबर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक असा काळ असतो, ज्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. कारण यानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. नवीन आयुष्यासोबत नवीन प्रश्न आणि समस्या देखील आयुष्यात उभ्या रहातात. ज्यांची उत्तरं बऱ्याचदा मिळत नाहीत किंवा लोकं शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. ज्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहातात.

या सगळ्यात मुलींच्या वैवाहिक जिवनात देखील बदल होतात. परंतू मुलींना लग्नानंतर अनेक प्रश्न पडतात, ज्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुलींना मिळतातच असं नाही. त्यांपैकी एक जो अनेक महिलांना किंवा जोडप्यांना पडतो, तो म्हणजे गरोदरपणात सेक्स करणं योग्य आहे का? आणि दुसरं म्हणजे प्रसूतीनंतर किती दिवसांनी सेक्स केलं पाहिजे?

हे प्रश्न लोकांना पडतात, मात्र याचं उत्तर त्यांना माहित नसतं किंवा कोणाला हा प्रश्न विचारावा हे कळत नाही, तसेच अनेकांना डॉक्टरांना विचारण्यासाठी देखील त्यांना लाज वाटते. जर तुमच्या मनात देखील असे प्रश्न उद्भवले असतील, तर चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरं…

हे वाचा : Pregnancy Tips: गरोदरपणात काय खावे? कसा असावा तुमचा रोजचा आहार

नॉर्मल प्रसूतीनंतर लगेलच शरीर सबंध ठेवले तर काय होईल?

जर एखाद्या महिलेची प्रसूती सामान्य पद्धतीने झाली असेल आणि तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच असं केल्यामुळे महिलेच्या पोटातील प्लेसेंटा बाहेर पडल्यामुळे गर्भाशयाला दुखापत होते. ही जखम भरून येण्यासाठी वेळ लागतो. अशा स्थितीत संबंध बनवल्याने स्त्रीच्या शरीरालाही हानी पोहोचते. त्यामुळे नॉर्मल प्रसूतीनंतर किमान दीड महिना शारीरिक संबंध टाळावेत.

सिझेरियन प्रसूतीनंतर किती दिवसांनी ठेवावेत शारीरिक संबंध?

सिझेरियन प्रसूतीदरम्यान पोटाच्या खालच्या भागात जास्त टाके येतात. यातून स्त्रीयांना सावरायला खूप वेळ लागतो. यास्थितीत शारीरिक संबंध ठेवल्यास हे टाके तुटण्याचा धोका असतो. जर टाके उघडले तर त्यामध्ये पू भरु शकतो, ज्यामुळे या समस्या आणखी वाढतात.

हे वाचा : गरोदरपणात नेमकी कोणती पुस्तके वाचावी, गर्भसंस्काराला आहे विशेष महत्त्व

शिवाय याचा महिलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे प्रसूतीनंतर टाके पूर्णपणे कोरडे होईपर्यंत अंतर ठेवणे खुपच गरजेचे आहे. त्यामुळे हा कालावधी दोन ते तीन महिन्यांपेक्षा जास्त असू शकतो.

(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News