23.1 C
New York
Saturday, July 20, 2024
spot_img

प्रचंड धावपळीचा आणि मेहनतीचा आजचा दिवस; ‘या’ राशींसाठी कठीण काळ – News18 लोकमत


आज दिनांक १४सप्टेंबर २०२२ वार बुधवार. आज भाद्रपद कृष्ण पंचमी. आज चंद्र मेष राशीत भ्रमण करेल .तिथे तो राहू सोबत योग करेल. आज भरणी श्राद्ध आहे. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य.

मेष

आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. प्रवास योग येतील मानसिक द्वंद्व जाणवेल.कार्यालयीन कामकाज सुरळीत राहील.लाभ होतील. दिवस उत्तम.

वृषभ

आयुष्यात नवीन शुभ घटनांची सुरवात होईल. रवि बुध आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देतील. गुरू महाराज काही नवीन जबाबदारी निर्माण करतील. परदेश संबंधी घटना घडतील. दिवस शुभ.

मिथुन

चंद्र मानसिक अशांती निर्माण करेल . आज कुठलाही आर्थिक व्यवहार जपून करा..परदेश बाबत शुभ फल मिळेल . लाभ होतील . दिवस शांततेत घालवा.

कर्क

आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात.प्रकृतीची काळजी घ्या. दशम स्थानात चंद्र राहू कार्यालयीन कामात जपा असे संकेत देत आहे. दिवस शुभ आहे.

सिंह

राशी स्वामी रवि सध्या सकारात्मक मानसिकता देईल .शरीरात ऊर्जा वाटेल. चंद्र राहू कार्य क्षेत्रात विशेष घटना घडेल . आज दिवस उत्तम जाईल.

कन्या

लाभ चंद्र राहू सोबत असून आज संतती विषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल .दिवस चांगला.

तुला

घरात अशांतता निर्माण होईल असे वागू नका.कलह टाळा.जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील .आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा.

वृश्चिक

अतिशय धावपळीचा असा हा दिवस असणार आहे.खूप महत्वाचे निर्णय , फोन वर संवाद होतील. पण प्रवास टाळा. नुकसान होईल.दिवस बरा आहे.

धनु

आर्थिक बाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे.काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. संततीला काही अडचणी येतील. दिवस मध्यम.

मकर

वक्री शनि , चतुर्थ चंद्र आहे, दिवस जरा मध्यम जाईल.मन काहीसे उदास राहील. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा. घरात जास्तीचे काम निघेल.दिवस संथ आहे.

कुंभ

व्यय स्थानात झालेली शनि ग्रहाची वक्री स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. तृतीय चंद्र आहे. प्रवास होतील.द्वितीय गुरू परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल.दिवस मध्यम आहे.

मीन

आज दिवस नातेवाईकांना भेट ,संपर्क करण्याचा आहे.काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा .कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास टाळा.दिवस शुभ.

शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_imgspot_imgspot_img

Today News

Popular News